भारत डेअरी बस थांबा चौफुलीवर "स्पीडब्रेकर" बसविण्याची मागणी

 




भारत डेअरी बस थांबा चौफुलीवर "स्पीडब्रेकर" बसविण्याची मागणी

 *पाचोरा दि.२५( प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार)जामनेर रोड स्ट्रिट हायवे वर संभाव्य अपघात टाळण्यासाठी भारत डेअरी बस थांबा चौफुलीवर "स्पीडब्रेकर" बसवण्यात यावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे

"भारत डेअरी बस" थांबा जवळील चौफुली (स्ट्रीट हायवे जामनेर रोड) ही  अपघाताचे स्थान बनत आहे दर एक-दोन दिवस, महिन्यात अपघात होत च असतात,जारगाव चौफुली हुन जळगाव, जामनेर जाणारे बस, मालवाहू वाहने मोटारसायकल,तसेच आता काही दिवसांत कृष्णापुरी हिवरा नदीवरील पुल लवकरच पुर्णत्वास येत आहे तर पाचोरा शहरात जाणारी वाहने,तसेच शाळकरी मुले यांचे वर्दळ वाढेल तसेच  मोटारसायकल तसेच इतर गावातुन येणारे वाहने व वरखेडी नाक्यावरुन गावात जाणारे ,जारगाव चौफुलीवर वरुन भरधाव वेगाने येणारे  असंख्य वाहने यात मोठी दुर्घटना घडते तरी यावर भारत डेअरी बस थांबा वर स्पीड ब्रेकर ची अत्यंत आवश्यकता आहे आणि  गावात किंवा रस्त्यावर समोरुन येणाऱ्या लहान मोठ्या वाहनांवर आदळतात त्यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील शंभर टक्के ताबा सुटतो आणि त्याचा मोठा अपघात होवून त्या वाहन चालकाला किंवा रस्त्याच्या वाटसरुला जबर दुखापत होते,काही दिवसाआधीपण एकाला आपला पाय गमवावा लागला,होता किंवा एखाद्या वेळेस जीव सुद्धा गमवावा लागेल तरी  म.सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष  स्पीड ब्रेकर बसवावा अशी जोरदार मागणी केली आहे....!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने