स्केटिंग स्पर्धा विजेती तेजस्विनी सोनवणे हिचे आय. पी. एस. श्री कुमार चिंथा यांचेकडून अभिनंदन.
. जुलै महिन्यात जाणारं इंडोनेशियात
जळगाव दि.२३ ( प्रतिनिधी)जामनगर गुजरात येथे झालेल्या Arsec Asia Asiatic events national लेव्हल च्या स्केटिंग स्पर्धेत तेजस्विनी विनोद सोनवणे हिने 12 वर्षा आतील इनलाईन या प्रकारात 500 मीटर,1000 मीटर . रोड रेस व रिले या चारही इव्हेंट मध्ये 4 गोल्ड मेडल पटकवली आहेत. आणि परत एकदा भारताच्या नकाशावर जळगांव जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे आणि जुलै महिन्यात होणाऱ्या इंडोनेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप साठी तिची निवड झाली आहे याचे सर्व श्रेय तीचे स्केटिंग प्रशिक्षक व पोलिस कॉन्स्टेबल जागृती काळे मॅडम यांना जाते
आणि तिचा सत्कार जळगांव चे आय. पी. एस. श्री कुमार चिंथा साहेब यांनी केला आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.