*माता रमाई यांचा स्मृती दिवस व सत्कार कार्यक्रम संपन्न*
आडगांव ता. चोपडादि.२९(प्रतिनिधी): येथे *दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल चोपडा शहर व तालुक्याच्या वतीने माता रमाई स्मृतीदिन निमित्त त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यांत आला .
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटन आयु. हितेंद्र बिरबल मोरे (मुख्याध्यापक कस्तूरबा माध्यमिक) हे होते .तसेच आडगांव येथील आयु.ओंकार दत्तू जाधव यांची कन्या कु.स्नेहा ओंकार जाधव ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव मधून एम.ए.डॉ.आंबेडकर विचारधारा विशेष प्राविण्याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केल्याने व आयु.अशोक लक्ष्मण बाविस्कर यांची कन्या कु. शारदा अशोक बाविस्कर ही सुद्धा विशेष प्राविण्यने उत्तीर्ण झाल्याने दोन्ही मुली व त्यांचा पालकांचा गौरव व सत्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ट्रॉफी देवून सत्कार करण्यांत आला.यावेळी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रा.आधार पानपाटील व ॲड.विलास बाविस्कर तसेच साहित्यीक राजेंद्र पारे या वक्त्यांनी मार्गदर्शन करून माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक शहराध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले.
सत्कारार्थी कु.स्नेहा जाधव हीने मनोगत व्यक्त केले तसेच कु. शारदा बाविस्कर यांनी माता रमाई यांचे त्यागा बाबत गीतातून मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास माजी तालुकाध्यक्ष सुदाम करनकाळ, तालुकाध्यक्ष बापूराव वाणे,उपाध्यक्ष छोटुभाऊ वारडे , महेंद्र सोनवणे जेष्ठ मार्गदर्शक जानकीराम सपकाळे,ओंकार जाधव,सामाजिक कार्यकर्ते भूरसिंग बाविस्कर,विजय बाविस्कर,राहुल बाविस्कर, दिपक भालेराव,माजी सैनिक धनराज बाविस्कर तसेच बौद्ध समाज बांधव महिला भगिनी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामचंद्र आखाडे यांनी केले व शेवटी आभार देवानंद वाघ यांनी मानले.