श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट



श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा तर्फे ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट

चोपडा दि.२८(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा.जि. जळगाव येथे प्रशिक्षण वा प्लेसमेंट समिती च्या वतीने अहमदाबाद येथिल वेस्टकोस्ट फार्मास्युटिकल प्रा. लि. हया कंपनी साठी 25 मे 2022 रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू अयोजित करण्यात आला. फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट वा क्वालिटी अॅश्युरन्स हया विभागासाठी मुलाखत घेण्यात आल्या. 50 विद्यार्थीयांनी ह्यात सहभाग नोंदवला. त्या पैकी धनंजय मनोज पाटील, मयूर अरुण नागपुरे, पियुष जितेंद्र पाटील आणि शुभम सरदार हे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली . कंपनी चे श्री ललित प्रजापती एचआर हेड वा सौ प्राप्ती पटेल एचआर एक्झिक्युटिव्ह यांनी मुलाखती घेतल्या. भविष्यात अजुन असे कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जातील व  विद्यार्यांनी त्यात सहभाग नोंदवावा अस आव्हाहन प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांनी ह्यावेळी केले. कॅम्पस इंटरव्ह्यू चे पूर्ण नियोजन प्लेसमेंट ऑफिसर सौ. क्रांती देवेंद्र पाटील वा प्रशिक्षण  ऑफिसर सौ. प्रेरणा जाधव यांनी केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन  व कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.अॅड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा सौ.आशाताई पाटील, सचिव सौ.डॉ.स्मिताताई संदीप पाटील, नानासो दिलीप साळुंखे  , भाऊसाहेब श्री.डी बी देशमुख, प्राचार्य डॉ.गौतम पी वडनेरे, रजिस्ट्रार प्रफूल्ल बी मोरे व दोन्ही शैक्षणिक प्रमूख श्री. तुषार पाटील आणि सौ. क्रांती पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने