*चोपड्यात तीन गावठी कटट्यांसह 14 काडतूसे जप्त ; तिघांना अटक , दोघे फरार*
चोपडा दि.२९(प्रतिनिधी ) :- सध्या महाराष्ट्रात गावठी कट्टे वागण्याचं प्रमाण वाढले आहे अश्यातच चोपडा आणि नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिक येथील पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपड़ा ग्रामीण पोलिस ठाणे याच्या संयुक्त पथकाने मध्य प्रदेशकडून चोपड़ा तालुक्यात गावठी कट्टे क येणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून अन्य दोन जण मात्र फरार झाले आहेत. ही कारवाई २८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तेल्या घाटाखाली करण्यात आली.
नाशिक येथील पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपड़ा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत चोपडा ते बोरअजंटी रस्त्यावर तेल्या घाटाच्या खाली दुपारी ३ वाजता एका पांढऱ्या रंगाच्या स्कापिओ (एमएच १२, एफयू-००५१) या चारचाकीतून अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी येथे राहणाऱ्या गणेश बाबासाहेब केदार (वय २४), कालिदास दत्तात्रय टकले (वय (२८), विकास अप्पासाहेब गिरी (वय २२) यांच्या ताब्यातून तीन पिस्तूल व १४ जिवंत काडतूसे तसेच तीन मोबाइल व दाढी करण्याच्या वस्तरा असा एकूण ६ लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात या तिघांना अटक
करण्यात आली आहे. या प्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
समूळ उच्चाटन होण्याची गरज -
चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्य प्रदेशकडून गावठी कट्टे नेहमी सापडत आहे. या घटना घडल्यानंतरही गावठी कट्टे पुन्हा पुन्हा महिन्यात अशा अनेक सापडत आहेत. या संदर्भात गावठी कट्टे मध्य प्रदेश मधूनच येतात. तर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पुढे चोपडा तालुक्यातून ते पुढे पसार होतात. त्यामुळे गावठी ॥ कट्ट्याचे समूळ उच्चाटन - झाले पाहिजे, अशी मागणी होत असते.
*यांचा होता पथकात समावेश*
या पथकात पोलिस महानिरीक्षक पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, गणेश जाधव, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शब्बीर शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, प्रमोद पारधी, लक्ष्मण शिंमाणे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास चौपडा ग्रामीण | पोलिस ठाण्याचे पीएसआय अमरसिंग वसावे करत आहेत.
*यातील दोन जण विविध गुन्ह्यातील आरोपी*
या प्रकरणातील आरोपी विकास गिरी याच्यावर आर्म ऍक्टव दंगलीचा गुन्हा दाखल आहे. तर कालिदास दत्तात्रय टकले याच्याविरुद्ध सन २०१६ मध्ये दंगलीसह अन्य दोन गुन्हे दाखल आहेत.