चोपड्यात व्यापारी संजय अग्रवाल यांच्या दुकानामागील पत्री शेडमधून महिंद्रा पिकअप व्हॅन चोरी..भामटा पसार..

 



  चोपड्यात  व्यापारीच्या दुकानामागील पत्री शेडमधून महिंद्रा पिकअप व्हॅन  चोरी..भामटा पसार..

चोपडा दि.२६(प्रतिनिधी ):- पत्र्याच्या शेडमध्ये  लावलेली महिंद्रा पिकअप व्हॅन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजयकुमार सुभाषचंद्र अग्रवाल (वय ५८) रा. ओंकार नगर, यावल रोड चोपडा हे व्यापारी आहे. त्यांचे शहरात संजय अग्रवाल नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी त्यांच्या मालकीची (एमएच १९ बीएम ७७६०) महिंद्रा पिकअप गाडी पार्कंग करून लावली होती. चोरट्यांनी   मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात  चोरट्यांनी    ९५ हजार रूपये किंमतीची पिकअप गाडी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने