चोपडा शहर व तालुका भाजपा कार्यकर्त्यांची आज महत्वपूर्ण बैठक*
चोपडा दि.२९(प्रतिनिधी): चोपडा तालुका व शहर भारतीय जनता पार्टीची महत्वपूर्ण "विस्तृत आढावा बैठक"दि:- ३०-०५-२२ सोमवार रोजी आमदार गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात संध्याकाळी ठीक 5:०० वाजता शहरातील सर्मथ पॅलेस आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीत पक्ष संघटन, बुथ रचना व आगामी येणाऱ्या निवडणूका तसेच अनेक विवीध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, खा.रक्षाताईं खड़से,आ.राजुमामा भोळे,पद्माकर महाजन,नंदु महाजन,हिराभाऊ चौधरी,सचिन पान पाटील,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,सरचिटणीस हनुमंत महाजन,सरचिटणीस चंद्रकांत धनगर. मनोहर बडगुजर,हेमंत जोहरी. सुनिल सोनगिरे, यांनी केले आहे.