प्रकाश चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक सन्मान

 



प्रकाश चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक सन्मान

चोपडा:दि.२९( प्रतिनिधी)- ऑडीटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार २०२२-२३ तसेच जळगांव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक व जिल्हास्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार कुऱ्हे पानाचे (ता.भुसावळ) येथील प्रकाश पी. चौधरी यांना कराड येथील राज्यस्तरीय अधिवेशनात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

         पुरस्कार वितरणप्रसंगी ना. बाळासाहेब पाटील (सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य) व राज्य सहकार आयुक्त तथा निबंधक अनिल कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तानाजी कवडे (सहनिबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य), ए.बी.पाटील (निवृत्त सहकारी अप्पर आयुक्त तथा सचिव मंत्रालय), शहाजी क्षीरसागर (अध्यक्ष, राज्य लेखा समिती) तसेच कौन्सिलचे अध्यक्ष रामदास शिर्के, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, विश्वस्त श्रीकांत चौगुले, बाळासाहेब वाघ, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर संपत नाना शिंदे, विश्वस्त दत्तात्रय पवार, संजय घोलप, संदीप नगरकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक म्हणून गौरविण्यात आले.

       प्रकाश चौधरी हे गेल्या २४ वर्षांपासून जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था, नोकरदार पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, प्राथमिक दूध उत्पादक संस्था यांचे लेखा परीक्षण तसेच सहकारी संस्थांना प्रशिक्षण देणे यासह सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने