कॅन्सर ला कॅन्सल करून कॅन्सर ग्रस्तांने आपले पुढचे आयुष्य तंबाखू गुटखा विरोधी अभियाना साठी केले समर्पित ,,,,,जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान चे ब्रॅण्ड एम्बेसेडर कॅन्सर ग्रस्त राज मोहम्मद खान शिकलगर यांचे प्रेरणादायी जीवन,,,,,,,

 



कॅन्सर ला कॅन्सल करून कॅन्सर ग्रस्तांने आपले पुढचे आयुष्य तंबाखू गुटखा विरोधी अभियाना साठी केले समर्पित ,,,,,जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान चे ब्रॅण्ड एम्बेसेडर कॅन्सर ग्रस्त राज मोहम्मद खान शिकलगर यांचे प्रेरणादायी जीवन,,,,,,,

.....................................................

31 मई जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष

.....................................................

चोपडा दि.२९(प्रतिनिधी):तंबाखू धूम्रपान ,गुटख्याच्या व्यसन  म्हणजे कॅन्सरला आमंत्रण देतात वर्षाला लाखो लोक कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचे बळी पडून मृत्यू च्या दारेत जातात ,,या व्यसनामुळे कॅन्सर झालेल्या लोकांचे हाल बघून ही लोक या व्यसनापासून दूर रहात नाही,

या व्यसनामुळे कॅन्सर सारख्या जीवघेणा आजार झाला जिवन मृत्यू च्या दारेत अडकला अशा वेळी जिवन मिळाले तर पुढचे आयुष्य लोकांना या व्यसना पासून दूर राहण्याचा प्रयत्न  करू कॅन्सर झाल्यानंतर जीवन कसा बदलतो असे ,आपला परिवार आपल्यामुळे आहे त्यांचा साठी व्यसनमुक्त राहून चांगला जीवन जगा ,,,असे आव्हान करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान चे ब्रॅण्ड एम्बेसेडर राज मोहम्मद खान शिकलगर यांचे आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त देत येईल


2010मधे तोंडाच्या कॅन्सर ने जकडल्यावर आपल्या हिंमतीने नातेवाईक मित्रमंडळी व हितचिंतकाचा परिश्रमा ने कॅन्सरला कॅन्सल करून आपला पुढचा बोनस आयुष्य लोकांना या व्यसना पासून रोकण्याचा व कॅन्सर बाबत जनजागृती करण्यासाठी समर्पित केले

आपली भावी पिढी व्यसनमुक्त रहावी म्हणून शिक्षणविभाग महाराष्ट्र राज्य ,आरोग्य विभाग, सलाम मुंबई फौंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ,जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा संयुक्त विदमाने जळगाव चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब ,व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया साहेब ,यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू मुक्त शाळा अभियान युध्द पातळी वर राबवून 2400 शाळा तंबाखू मुक्त केले व लवकरच जागतिक स्तरावर जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळेचा होईल 

आता पर्यंत शिकलगर यांनी 350 च्या वरती लोकांना व्यसनमुक्त केले आहे ,सार्वजनिक ठिकाणी लोकांना आपला बदललेल्या चेहरा दाखवून या व्यसनापासून दूर राहण्यासाठी आव्हान करतात ,कॅन्सर ग्रस्तांना उपचारासाठी मदद व मार्गदर्शन करतात आतापर्यंत 800 च्या वरती लोकांना मदद केली आहे  लवकरच तंबाखू मुक्त शासकीय कार्यालये अभियान राबवण्यात येईल

राज मोहम्मद यांना आतापर्यंत 60 पुरस्कार व सम्मानपत्र मिळाले आहे  आपल्याला हा आजार कधीही परत येऊ शकते म्हणून आपल्या कडून जेवळे लोकांना या व्यसना पासून रोखता येईल त्यांना व्यसनमुक्त करेन ,माझा जीवन प्रसिद्धी साठी नाही तर लोकांना जगण्याची प्रेरणा मिळावी जीवन फार सुंदर आहे आपल्या परिवारासाठी जगा आज त्यांना तुमची गरज आहे असे आज तंबाखू विरोधी दिना निमित्त आव्हान केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने