समान नागरी कायदा काळाची - अॕड.अमित दुबे.. शिरपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित कार्यक्रमांतून केले संबोधन





समान नागरी कायदा काळाची - अॕड.अमित दुबे.. शिरपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित  कार्यक्रमांतून केले संबोधन

शिरपूर दि.२१(प्रतिनिधी)अभाविप शिरपूर शाखेच्यावतीने शहरातील बाबुराव वैद्य मार्केटमध्ये Why? Uniform Civil  Code कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         समान नागरी कायदाया संदर्भात लोकांच्या मनातील असणारे संभ्रम व समाजात या कायद्याविषयी असणारी चुकीची धारणा दूर व्हावी याकरता विद्यार्थी परिषदेतर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समान नागरी कायदा मुळे महिलांना त्यांचे हक्क मिळतील या कायद्यामुळे समाजातील कुठल्याही घटकाचे नुकसान होणार नाही हा कायदा काळाची गरज आहे असे प्रतिपादन एडवोकेट अमित दुबे यांनी केले.

     त्याचबरोबर समान नागरी कायदा कशासाठी या विषयाची मांडणी अभाविप शिरपूर शहरसहमंत्री हंसराज चौधरी यांनी केली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून वनवासी कल्याण आश्रमाचे जितेंद्र महाजन त्याचबरोबर सुमित गिरासे, पुष्पक जैन, हेमंत पाटील,हिमाणी पवार उपस्थित होते

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत पटेल यांनी केले तर आभार पवन राजपूत यांनी मानले....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने