विचखेडा विकास सोसायटी चेअरमनपदाची माळ अशोक जगन्नाथ धनगर यांच्या गळ्यात तर व्हाइस चेअरमनपदी पत्रकार चंद्रकांत गुलाबराव पाटील यांची वर्णी*

 विचखेडा विकास सोसायटी चेअरमनपदाची माळ अशोक जगन्नाथ धनगर यांच्या गळ्यात तर व्हाइस चेअरमनपदी पत्रकार चंद्रकांत गुलाबराव पाटील यांची वर्णी


विचखेडा ता.चोपडा  दि.२१(प्रतिनिधी): विचखेडा विकास सोसायटी चेअरमनपदी अशोक जगन्नाथ धनगर यांची तर व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 चोपडा  तालुक्यातील विचखेडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक तेरा जागेसाठी नुकतीच   बिनविरोध  झाली होती त्यात सोसायटीचे बिनविरोध कर्जदार संचालक सुधाकर जगन्नाथ धनगर, चंद्रकांत गुलाबराव पाटील अशोक गिरीधर पाटील, नवल काळू धनगर ,बाळू सुकलाल कुंभार, संजय (राजेन्द्र) दत्तू धनगर, आजोबा शंकर शिरसाठ ,भास्कर अर्जुन पाटील विमुक्त व भटक्या जाती गटातून अशोक जगन्नाथ धनगर इतर मागासवर्गीय प्रवर्ग गटातून माणिक पंडितराव पाटील महिला राखीव गटातून खटाबाई रमेश पाटील सुमनबाई बळवंत धनगर अनुसूचित जाती जमाती गटातून प्रकाश साहेबराव शिरसाठ हे बिनविरोध निवडून आले आहेत. काल चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणुक  अविरोध होऊन चेअरमनपदाची माळ अशोक जगन्नाथ धनगर यांच्या गळ्यात तर व्हाइस चेअरमन पदाची माळ पत्रकार चंद्रकांत गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात पडली. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुभाष कुंभार, नानु धनगर, राजमल बोरसे, प्रमोद न्याहळोदे ,शरद कोळी यांच्या सह गावकऱ्यांनी केला.  यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने