दलित साहित्याचा केंद्रबिंदू उपेक्षित माणूस आहे: जयसिंग वाघ





 दलित साहित्याचा केंद्रबिंदू उपेक्षित माणूस आहे: जयसिंग वाघ

------------------------------------

जळगाव दि.०९(प्रतिनिधी)      दलित साहीत्य नेहमीच आपल्या लेखनात उपेक्षित माणसाला केंद्रस्थानी ठेवत असतो व समाजात समता , स्वातंत्र्य ही तत्वे प्रस्तापित व्हावी , कुणावरही अन्याय झाला असल्यास न्यायाच्या बाजूने उभे राहते म्हणून दलित साहित्य हे मानवतावादी साहित्य ठरते असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिध्द आंबेडकरी विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले 

मानवतावादी साहित्याची प्रस्थापना करणारे साहित्य दलित साहित्य या विषयावर आयोजित सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते सदर संमेलन जळगाव येथील कांताई सभागृहात दिनांक 7 व 8 मे रोजी संपन्न झाले

 आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात जयसिंग वाघ पुढं म्हणाले की मानवतावादी साहित्य हे ईश्वर ,ईश्वरी संकेत , स्वर्ग , नरक , आत्मा नाकारते तर मानवाला केंद्रबिंदू मानून इहवाद , व्यक्तीवाद , बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारते तेंव्हा ईश्वर , ईश्वरी संकेत यावरील साहित्य हे मानवतावादी साहित्य ठरू शकत नाही हे आपण समजून घ्यावे , दलित साहित्याने अतिशय कमी कालखंडात वैश्विक रूप धारण केले ही मोठी क्रांतिकारक घटना आहे 


अध्यक्षस्थानावरून भाषण करतांना प्रा डॉ  म  सु  पगारे यांनी  विवीध दाखले देत दलित साहित्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कशी उंची गाठली आहे याचे विश्लेषण केले , मानवतावादी तत्वे स्विकारल्या खेरीज जे साहित्य लिहिले जात असेल ते साहित्यच ठरू शकत नाही


सुरवातीस माजी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या हस्ते डॉ पगारे व वाघ यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कवी डी बी महाजन यांनी केले

संमेलन अध्यक्ष प्रभा गणोरकर , उद्घाटक डॉ विश्वनाथ शिंदे , संयोजक सतीश जैन आदिंसह कवी , लेखक मोठ्या संखेने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने