*ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रविवारी गुडघेदुखीवर व्याख्यान* अत्यावश्यक रुग्णांची मोफत तपासणी*
चोपडा दि.०१ एप्रिल (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा आणि नॉर्दन जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. ३ एप्रिल रोजी गुडघेदुखीवर खास व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या नारायणवाडी, विठ्ठल मंदिरासमोरील ज्येष्ठ नागरिक संघ भवनात सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. यावेळी जळगाव येथील सांधेरोपण तज्ञ डॉ. मनिष चौधरी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच अत्यावश्यक रुग्णांची मोफत तपासणीदेखील केली जाणार आहे. तसेच पुढील उपचारासाठी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघाकडून देण्यात आली आहे.
या गुडघेदुखीवरील व्याख्यानाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाचे अध्यक्ष व्ही. एस. करोडपती सर आणि सचिव प्रमोदनाना डोंगरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.