चोपडा तालुका माध्यमिक पतपेढीच्या अध्यक्षपदी सुनील चौधरी बिनविरोध

 



चोपडा तालुका माध्यमिक पतपेढीच्या अध्यक्षपदी सुनील चौधरी बिनविरोध

चोपडा दि.०२एप्रिल (प्रतिनिधी)- येथील चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित, चोपडाच्या अध्यक्षपदी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील देविदास चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सत्रासेन आश्रमशाळेच्या शिक्षिका वंदना सरदार पावरा - भादले यांची निवड करण्यात आली.

चोपडा तालुका माध्यमिक पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ११ पैकी नऊ जागा मिळवत सहकार पॅनलने सत्ता मिळवली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. याप्रसंगी सर्व संचालकांसोबत पतपेढीचे मार्गदर्शक, शिक्षक नेते आर. एच. बाविस्कर, माजी मुख्याध्यापक टी. एम. चौधरी, माजी अध्यक्ष व्ही. पी. चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. व्ही. पाटील यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पाटील यांनी काम पाहिले. योगेश पाटील व विजय पाटील यांचे सहकार्य लाभले. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने