समता विद्या मंदिरात उभारली सुसंस्काराची गुढी



समता विद्या मंदिरात उभारली सुसंस्काराची गुढी

मुंबई दि.०२ एप्रिल(शांताराम गुडेकर )समता विद्या मंदिर साकीनाका, मुंबई या शाळेतील मुला- मुलींनी पारंपारिक वेश परिधान करून सुसंस्काराची गुढी उभारली . संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार यांच्या संकल्पनेतून शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर व विद्यार्थी यांनी भारतीय संस्कृतीचे व संस्काराचे मोल जाणून त्याला उजाळा देण्यासाठी तसेच मुला-मुलींमध्ये निर्भयता, आत्मविश्‍वास,आणि परस्पर सहकार्य जोपासले जावे यासाठी ही सुसंस्काराची उभारली गुढी.शाळेतील इयत्ता पहिली ते नववीतील मुला-मुलींनी लेझीम ढोल ताशांच्या गजरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला. यावेळी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मातृ -पितृ ऋण, देशभक्ती, समाजऋण, सर्वधर्मसमभाव पर्यावरण रक्षण,आणि स्त्री -पुरुष समानता इत्यादी मूल्यांचे सगळ्यांनी पालन करणे आवश्यक आहे. असा संदेश यावेळी  दिला गेला. विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे काम ,सुजाण व आदर्श नागरिक घडविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून समता विद्या मंदिर  शाळेत अथकपणे सुरू आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी टीम समताने खूप मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने