दक्षता मित्र मंडळ आयोजित गुडीपाडव्यानिमित्ताने शोभयात्रा उत्साहात संपन्न
मुंबई दि.०२ एप्रिल (शांताराम गुडेकर ) :मुंबई महानगरपालिका एन विभागच्या अधिपात्यात येणाऱ्या मुंबई घाटकोपर (पश्चिम) मधील हिलस्टेशन म्हणून प्रख्यात असलेला खंडोबाचे मंदिर, त्याच परिसरात म्हणजे जय मल्हार नगर मध्ये दक्षता मित्र मंडळ आहे. या मंडळात कोकणातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहेत.या मंडळात अनेक उत्सव साजरे केले जातात. पण गुडीपाडवा आणि मराठी नविन वर्षाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले होते.आपल्या मंडळात पहिल्यांदाच शोभयात्रा निघणार असल्याने सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते.डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी होणारा कार्यक्रम बंद करून लहान मुलांचे डान्स, कॉमेडी विनोद सारखे कार्यक्रम मराठी नविन वर्षाच्या पूर्वसंधेला साजरे करून दक्षता मित्र मंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षता मित्र मंडळ म्हणजे मुंबई मधील सर्वात उंच शिखरावर राहणारे ठिकाण आहे.येथे अगदी पर्यावरण पूरक वातावरण आहे आणि इतक्या उंचावर मराठी नववर्षे साजरा कदाचित पहिल्यांदाच होत असेल असे म्हणायला हरकत नाही.या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करणे याचे सर्व श्रेय मंडळाचे अध्यक्ष श्री.सहदेव शेलार आणि सचिव श्री.अमित वाडेकर आणि सर्व पदाधिकारी यांना जाते.एवढ्या उंचावर कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे जीवाची बाजी लावण्यासारखी आहे आणि हे काम साह्याद्रीचे शिलेदारच करू शकतात
बालगोपाल महिला मंडळ आणि सर्व सभासद एकत्र आल्यामुळे कार्यक्रम एकदम उत्साहात संपन्न झाला अशी माहिती मंडळाचे सदस्य श्री.नितिन सखाराम जाधव यांनी दिली आहे.