जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद पाटील.. डिझेल दरवाढीप्रणाने आमचेही दर ठरवू तहसीलदारांना निवेदन




जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद पाटील.. डिझेल दरवाढीप्रणाने आमचेही दर ठरवू तहसीलदारांना निवेदन

चोपडा दि.०२ एप्रिल( प्रतिनिधी) चोपडा तालुक्यात जेसीबी मालक संघटनेची स्थापना झाली असून आता डिझेलचे दर जसं जसे वाढत जातील त्यानुसार आम्हि आमचें दर ठरवूअसे निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद पाटील यांचें कार्यकारिणी दिलें आहे.

चोपडा तालुका जेसीबी मालक संघटना निर्माण झाली असून रजिस्टर नंबर एनएसके/ जे2203 असा आहे व त्यामुळे आमची चोपडा तालुका पूर्ण जेसीबी मालक एक कायदेशीर संघटना निर्माण करण्यात आलेली आहे सदरहून दररोज डिझेलचे वाढते दर असून आम्हाला देखील जुन्या दरात काम करणे शक्य होत नाही तसे आमच्या संघटनेच्या नियमावली प्रमाणे आम्ही असे ठरविले आहे की दिनांक 2/4 /2022 पासून डिझेल दर व महागाई ज्याप्रमाणे वाढेल त्या प्रमाणे आमचे जेसीबी संघटनेचे दर देखील वेळोवेळी ठरविले जातील  त्याप्रमाणे प्रत्येक जे.सी.बी. मालकाचे जेसीबी संघटना जो दर ठरवेल त्याच दराने व नियमा प्रमाणे काम करावयाचे आहे असे निवेदन मा. तहसीलदार साहेब यांना  दिल निवेदन देताना अध्यक्षः विनोद मुरलीधर पाटील, उपाध्यक्षः शिरीष माणिक बडगुजर,जनरल सेक्रेटरी ः संदीप बाबाजी कासव,खजीनदारः रमेश माणिक मिमरुट,सतीश विकास पाटील,विश्र्वास वसंतराव पाटील,छोटु काशिनाथ धनगर, समाधान धर्मा धनगर,बाहादूर रमेश देसले , भैय्या भाऊ आदी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने