*धुळे येथे शिव पांझरेश्वर प्रतिष्ठान वतीने झुलत्या पुलावर २३ फुट उंचीच्या मुर्तीसह २३ फुट उंचीची गुढी उभारून हिंदु नववर्षाचे स्वागत..*
धुळे दि.०२ (प्रतिनिधी) धुळे शहराच्या वैभवात भर टाकणा-या माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीवर झुलता पुल बनविण्यात आला आहे आणि या पुलावर भगवान शंकराची २३ फुट उंचीची भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हयातील आणि शहरातील अनेक शिवभक्तांचे श्रध्दास्थान आहे.
गुढीपाडवा अर्थात हिंदु नववर्ष निमित्ताने श्री शिव पांझरेश्वर प्रतिष्ठान, धुळे यांच्या वतीने दिनांक ०२/०४/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता राष्ट्रीय एकात्मतेची २३ फुट उंचीची गुढी उभारण्यात आली. स्वामी नारायण मंदिर, धुळेचे प्रमुख कोठारी आनंद जीवन स्वामी धुळे गुरुव्दारासमितीचे बाबा धिरजासहजी, किसान टस्टचे विश्वस्त तेजस गोटे, शिव पांझरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी कोठारी आनंद स्वामी यांनी तमाम शहरवासियांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सर्वश्री नितिन भामरे, भोला गोसावी, मनोज वाल्हे, डॉ. अनिल पाटील, प्रकाश महानोर, मयुर खैरनार वाल्मिक साळुंखे, सतिष बहाळकर, प्रकाश जाधव, अनिल चौधरी, छोटूआप्पा गवळी, वामन मोहिते, विशाल चित्ते, अविनाश लोकरे, सचिन पोतेकर, दादाभाऊ पाटील, स्वप्निल बहाळकर, अभिमन्यु बच्छाव आदि उपस्थित होते.