आबासाहेब दिलीप शिरसाठ सेवानिवृत्त*



आबासाहेब दिलीप शिरसाठ सेवानिवृत्त*

        चोपडादि.०२एप्रिल(प्रतिनिधी) एस.के.नगर येथील राहिवासी व शासकिय आदिवासी मुलांची वस्तीगृहाचे सहाय्यक आबासाहेब दिलीप शिरसाठ हे आपल्या प्रदिर्घ ३३ वर्ष सेवा करून नुकतेच ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.शिरसाठ यांनी महाराष्ट्रातील बहुतेक आदिवासी क्षेत्रातील वस्तीगृहात आपली सेवा बजावली त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा केली तेथील आदिवासी मुलांना आपलं मुलं अशी वागणूक देवून आपलेस केले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त बहुतेक माजी विद्यार्थ्यीनी भेटून भावी आयुष्याच्या शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले .

       यावेळी आबासाहेब दिलीप शिरसाठ यांना कास्ट्राईक शिक्षक संघटना चोपडा तालुकाध्यक्ष भरत शिरसाठ व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष छोटूभाऊ वारडे (पत्रकार) यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सह पत्नी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी देवानंद वाघ सरचिटणीस,संजय सांळुखे संघटक,दिपक मेढे आश्रमशाळा प्रतिनिधी,रामचंद्र आखाडे सचिव,कांतिलाल सांळुखे सदस्य ,युवराज करनकाळ सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने