*केळी पिकास प्रति हेक्टर 4 लाख 64 हजारांची तरतुद लागू करण्याची खासदार उन्मेश दादा पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी*
जळगाव दि.०२एप्रिल- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वरील संदर्भात नमुद शासन निर्णया प्रमाणे केळी पिकाचा समावेश करण्यात आलेला असून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमवेत चर्चा करते वेळी व प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार मजुरी/सामुग्री, कुशल/अकुशल घटका करिता खालील प्रमाणे आर्थिक तरतुदीचा विचार करुन केळी पिकास ४ लाख ६४ हजारांची प्रती हेक्टरी तरतूद करावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आपल्या निवेदनात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वरील संदर्भात नमुद शासन निर्णया प्रमाणे केळी पिकाचा समावेश करण्यात आलेला असून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमवेत चर्चा करते वेळी व प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार मजुरी/सामुग्री, कुशल/अकुशल घटका करिता खालील प्रमाणे आर्थिक तरतुदीचा विचार करुन केळी पिकास
{सदरील तरतूद १ हे. क्षेत्रावरील १.५x१.५ मी. अंतर लागवडीकरता आहेत.}
१) जमीन तयार करणे (नांगरणे/ वखरणे/शेणखत देणे/ गादीवाफे तयार करणे इ.) :- अंदाजित रक्कम रु. ६८,०००/- प्रति हे.
२) खड्डे खोदणे (०.४५x०.४५x०.४५ मी.) :- अंदाजित रक्कम रु.४२,०००/- प्रति हे.
३) लागवड व संवर्धन करणे :-
अ) टिशू रोप/ कंद लागवड करणे :- ४४४४ रोपे प्रति हेक्टर व रू.१५/- प्रति रोप (लागवड खर्चा सहित) :- रक्कम रु.८२,०००/- प्रति हे.
ब) खत देणे (जैविक खत, पीएसबी/केएमबी/युरिया/एस.एस.पी./ पोटॅश/ सुषमा अन्नद्रव्य:- अंदाजित रक्कम रु.१,५८,०००/- प्रति हे.
४) आंतर मशागत करणे :- अंदाजित रक्कम रु.४३,०००/- प्रति हे.
५) पिक संरक्षण करणे :- अंदाजित रक्कम रु.३२,०००/- प्रति हे.
६) पाणी देणे :- अंदाजित रक्कम रु.२४,०००/-
७) इतर खर्च :- (केळी कापणी वेळी वाहतूक इ.) रक्कम रु.१५०००/- प्रति हे.
असे एकूण रक्कम रु.४,६४,०००/- (अक्षरी रक्कम रुपये चार लाख चौषष्ट हजार मात्र) प्रति हेक्टरी किमान रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यास केळी उत्पादक शेतकर्यांचा खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याने दिलेल्या निवेदनात बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मा.ना.श्री. संदिपानराव भूमरे मंत्री, रोजगार हमी व फलोत्पादन,महाराष्ट्र राज्य, मुंबई., मा.श्री. एकनाथ डवले साहेब प्रधान सचिव कृषि, महाराष्ट्र राज्य, मुंबई.,मा.श्री. नंदकुमार साहेब अप्पर मुख्य सचिव, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांना देण्यात आल्या आहेत.