चोपड्यात चार दिवसीय रोटरी उत्सवाचा उद्या शानदार शुभारंभ..दिग्गजांची उपस्थिती.. जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन*
चोपडा दि.२८ (प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे आयोजित रोटरी उत्सवाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक २९ एप्रिल २०२२, वेळ : सायं. ०६.०० वा. कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, यावल रोड, चोपडा येथे होत आहे
उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान
श्री. अरुणभाई गुजराथी (माजी अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य)हे भूषविणार असून उद्घाटन जिल्हाधिकारी
श्री. अभिजितजी राऊत यांच्या शुभहस्ते होतं आहे
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे ,नगराध्यक्षा सौ. मनिषाताई जीवन चौधरी ,माजी आमदार श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे ,माजी आमदार,श्री. कैलास गोरख पाटील ,माजी आमदार श्री. जगदीशचंद्र रमेश वळवी, माजी आमदार श्री. दिलीपराव शंकरराव सोनवणे, सौ. अश्विनी प्रसन्न गुजराथी (डिस्ट्रीक्ट चेअरमन, इनरव्हील DIST-303), आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सलग चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात चोपडेकरांना विविध प्रकारच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यात २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम, विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम व संदीप सोनार निर्मित स्वरांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे . ३० एप्रिल रोजी बापू डेअरीचे संचालक बापू महाजन यांचे " शून्यातून विश्व " या विषयावर व्याख्यान असणार आहे तर अस्सल खान्देशी कलाकार प्रवीण माळी यांचे " आयतं पोयतं सख्यानं " यांचा एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी भास्कर पाटील ( उप सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ पुणे ) यांचे कृषिमाल विक्रीचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तर इ - बाईकचे महत्व व भविष्य या विषयावर श्रीराम पाटील यांचे व्याख्यान , तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. २ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रम , पियुष जाधव ( संगीत विशारद ) यांचे बासरी वादन व रोटरी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
जीवनाचा आनंद रंगे - रोटरी उत्सवाच्या संगे' हया थीमनुसार चोपडा रोटरी क्लब ने उत्सव २२ चे आयोजन केले आहे. सदर उत्सवात बिझिनेस स्टॉल ४९, प्रिमियम कॉर्नर स्टॉल ३, एकझीकेटीव्ह स्टॉल २, प्रिमियम बिझिनेस स्टॉल १४, प्रिमियम ऑटोस्टॉल ६, खाद्यपदार्थ स्टॉल ६० अशा एकूण १३४ दुकानांद्वारे या उत्सवात ग्राहकांसाठी विक्री तसेच बालगोपालांसाठी हौसमौज व विविध करमणुकीची साधने , खेळण्यांची दुकाने या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
या चार दिवसीय रोटरी उत्सवात किमान एक लाख लोक भेटी देतील असा आशावाद चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. पंकज बोरोले , रोटे.प्रविण मिस्त्री (मानद सचिव ) ,प्रकल्प प्रमुख रोटे. ॲड. रुपेश पाटील , सह प्रकल्प प्रमुख रोटे. चेतन टाटिया , रोटे.तेजस जैन (खजिनदार) आदिंनी व्यक्त केला आहे. शहरातील व तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोटरी उत्सवाच्या आनंद घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे..