अकोला बाजार येथे पीक कर्ज मेळावाचे आयोजन*

 



अकोला बाजार येथे पीक कर्ज मेळावाचे आयोजन*

 अकोला बाजार दि.३० (प्रतिनिधी प्रवीण राठोड)अकोला बाजार ही परिसरातील मोठी बाजार पेठ आहे त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला बाजार येथे शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला. हा मेळावा दिनांक 26-एप्रिल 22 ला तहसील मंडळ, सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे डाखोरे सेलेब्रेशन हॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी अकोला बाजार परिसरातील सर्व खेडेगावातील सर्व शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यवतमाळ तहसीलदार श्री कुणाल झाल्टे यांनी केले तर अतिरिक्त जिल्हाधिकारी दुबे साहेब यांनी शेतकर्‍यांना होणारा त्रास, हेलपाटा, पीक कर्जविषयक आणि संबधित कागदपत्राविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित म्हणुन विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेंट्रल बँक ऑफ़ इंडिया , स्टेट बँक ऑफ़ इंडिया ,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक, सोसायटी ईत्यादी चे सर्व शाखा व्यवस्थापक, अधिकारी तसेच मंडळ अधिकारी, अकोला बाजारचे  सरपंच योगेश राजूरकर, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने