*रुग्ण हक्क संरक्षण समिती जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विजय बाविस्कर*

 



*रुग्ण हक्क संरक्षण समिती जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विजय बाविस्कर*

जळगाव दि.०४(प्रतिनिधी)-रुग्ण हक्क संरक्षण समिती जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विजय बाविस्कर (सुटकार)यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अशोक पालक यांच्या सुचनेनुसार ही नियुक्ती केली आहे.

  रुग्णांचा न्याय व हक्काचे कायम संरक्षण करणारी महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यात रुग्णसेवार्थ कार्य करणारी एकमेव समिती या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक रुग्णांना त्यांचा हक्कासाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे आत्ता पर्यत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे अश्या या रुग्णहितार्थ कार्य करणाऱ्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या जळगाव कार्याध्यक्षपदी चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुळ रहीवासी विजय बाविस्कर यांची निवड समिती संस्थापक अध्यक्ष अॕड निलेश करमुडी व प्रदेश अध्यक्ष हनमंत गोत्राळ आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख अशोक पालक यांच्या सुचनेवरुन जिल्हाध्यक्ष राहुल गोत्राळ यांनी नियुक्तीपत्र देऊन जाहीर केली * सदर नियुक्ती बद्दल रुग्ण हक्क संरक्षण समिती टिमच्या सर्वानी नवनियुक्त कार्याध्यक्ष यांचे अभिनंदन करुन व शुभेच्छा दिल्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने