घोडगाव येथील तरुणाची आजाराला कंटाळून गळफास
गलंगी,ता.चोपडा दि.०३ ( प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी) घोडगाव ता.चोपडा येथील तरुण रवींद्र चुनीलाल सोनार वय 35 याने आजाराला कंटाळून गावाबाहेरील बंद असलेल्या हतनुर वसाहतीत चिंचेच्या झाडाला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना दिनांक 3.4 .2022 रविवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत तरुणाला गेल्या दोन-तीन वर्षापासून डायबिटीस आजार जळला होता हा त्रास दोन-तीन दिवसापासून वाढल्यामुळे तो त्रस्त होता त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असे वृत्त आहे श्री अरुण काशिनाथ पाटील हे वसाहती जवळ उभे असता सदरील घटना त्यांच्या लक्षात आली असता त्यांनी लागलीच गावाचे पोलीस पाटील प्रभाकर सोनवणे व उपसरपंच जयवंत पाटील यांना फोनवरून कळवली असता त्यांनी व ईश्वर दुसाने (ग्रामपंचायत सदस्य),आर.एफ.मणियार(ग्रामपंचायत सदस्य), गोपाल भोई (ग्रामपंचायत सदस्य) यांनी सहकार्य केले., ग्रामिण पोलीस स्टेशनचे घोडगाव बीट चे पोलीस कॉन्स्टेबल सुनील कोळी राजू महाजन यांना फोनवरून ही माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी दाखल झाले असता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कूनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल सुनील कोळी राजू महाजन लीलाधर भोई हे करीत आहे त्याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे