पेट्रोल - डिझेल -खाद्यतेल व घरगुती गॅस दरवाढी वर क्रेंद्र सरकारने नियंत्रण ठेवण्या बाबत .....
चोपडा दि.०३ (प्रतिनिधी) युवासेना चोपडा तालुक्याचा वतीने चोपडा येथे निवेदन देण्यात आले सध्या राज्यात व देशभरात पेट्रोल - डिझेल घरगुती गॅस सिलेंडर चे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले आहे. मध्यमवर्गीय लोकांना वाहने वापरणे व घरातील गॅस सिलेंडर वापरणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल ,खाद्यतेल किंमती कमी जास्त होत असल्याने महागाई हि गगनाला भिडत आहे या माहागाईने सर्व सामान्याची दिवाळ काढले आहे आणि केंद्र सरकार हे मुग गिळुन बसल्या सारखे आहे महागाईचा भडका कमी न झाल्यास युवासेना पूर्ण राज्यभरात उग्र आंदोलन उभे करेल.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे घरगुती गॅस सिलेंडर खाद्यतेलाचे वाढवण्यात आलेल्य दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दयावा असे अश्याचे निवेदन देण्यात आले यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी तालुका प्रमुख गोपाल चौधरी शहर प्रमुख डाॅ.रोहन पाटिल शहर प्रमुख प्रदिप बारी अनिल बाविस्कर भैय्या महाजन तुषार पाटील संदिप पाटील गोलु मराठे भुषण चौधरी बंटी पाटील यासह युवासैनिक उपस्थित होते.