प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कृषि प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न.. कृषि उपसंचालक अनिल भोकरे


 प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कृषि प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न.. कृषि उपसंचालक अनिल भोकरे

जळगाव, दि.०३ (प्रतिनिधी) : - प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता जिल्हाधिकारी जळगाव यांचे अध्यक्षतेखाली २३ मार्च, २०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद या ठिकाणी कृषि  प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण संपन्न झाले या कार्यक्रमास  उपस्थितीत प्रमुख शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद  हेमंत बाहेती, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर,  कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल भोकरे, विषय विशेषज्ञ उद्यान विद्या डॉ. धीरज नेहते, विषय विशेषज्ञ अन्न प्रक्रिया तुषार गोरे, सिचन धुमाळ, दिनेश गवळी व बँकेचे प्रतिनिधी इत्यादीनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

                प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक लाभार्थ्यांचे सूक्ष्म अद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे सर्वकष मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य करणे या उद्देशासाठी २३ ते २५ मार्च, २०२२ व २८ मार्च ते ३० मार्च २०२२ या कालावधीत असे एकुण ६ दिवसांचे निवासी प्रशिक्षणास ६० लाभार्थींचे आयोजन करण्यात आले होते.

                प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदरील योजनेअंतर्गत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकुण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल रु. १० लाख अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी केळी पिकावर नविन प्रक्रिया करुन उत्पादन घेणे किंवा सध्या कार्यरत असलेल्या कृषि अन्न प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तरासाठी प्रकल्प पात्र असतील सदरील योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने विकसीत केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

                शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक किंवा विशेष उद्देश वाहन  (S.P.V) यांना ब्रँडींग व मार्केटीग या घटकाअंतर्गत कच्चामालाची खरेदी ते विक्री पर्यंत टप्प्याटप्प्याने हाती घ्यावयाच्या उपक्रमाचा तपशील महत्वाचा नियंत्रणाच्या बाबी, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनाच्या जाहिरात व प्रचार संबंधित राबवयाचे उपक्रम सहभागी होणाऱ्या उत्पादकांची संख्या व आर्थिक उलाढाल वाढविणेबाबत सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले.

 सदरील योजनेअंतर्गत सामाईक पायाभुत सुविधा या घटकांतर्गत शेतकरी उत्पादन कंपनी, शेतकरी उत्पादन संघ, सहकारी उदयोजक संघ, सहकारी उत्पादक संस्था, शासन यंत्रणा, खाजगी उदयोग यासाठी इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभुत सुविधा जसे शेती उत्पादनाचे वर्गीकरण, ग्रेडींग, कोठार आणि कोल्ड स्टोरज, केळी पिकाच्या प्रक्रियेसाठी सामान्य प्रक्रिया सुविधा घटकाअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे  कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने