घड्याळाच्या काट्याप्रमाणे झपाट्याने विकास कामांचा काटा फिरविणारे दमदार नगरसेवक किशोर बाविस्कर यांचेवर पुष्प सुमनांची उधळण..* *भागवत कथा समारोहातही बाविस्कर दाम्पत्याच्या यथोचित गौरव*






 *घड्याळाच्या काट्याप्रमाणे झपाट्याने विकास कामांचा काटा फिरविणारे दमदार नगरसेवक किशोर बाविस्कर यांचेवर पुष्प सुमनांची उधळण..* *भागवत कथा समारोहातही बाविस्कर दाम्पत्याच्या यथोचित गौरव*

जळगांव दि.२९(प्रतिनिधी) महापालिका अंतर्गत येणारा  प्रभाग क्रमांक २ चा ४० वर्षापासून खुंटलेला विकास अवघ्या ८ वर्षात विकासाची जादुई कांडी फिरवणारे जनसेवेने झपाटलेले दमदार  नगरसेवक ‌ किशोर आप्पा बाविस्कर व नगरसेविका सौ.उज्वलाताई किशोर बाविस्कर ह्यांचा सत्कार समारोहाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून नुकताच भागवत कथा सप्ताहात ही बाविस्कर दाम्पत्याच्या यथोचित गौरवाने परिसर पुष्प सुमनांनी उधळून निघाला. हा त्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या अद्वितीय अशा कामांची पावती असल्याचा निर्वाळा परिसर वासियांनी दिला आहे.

  नगरसेवक किशोर आप्पा बाविस्कर यांनी प्रभाग क्रमांक २ मधील कांचन नगर, हरिओम नगर,प्रजापत नगर, चौघुले प्लाट, शिवाजी नगर या भागात गेल्या आठ वर्षांपासून घड्याळाच्या काट्याप्रमाणे झपाट्याने विकास कामांचा  धडाका सुरू आहे.संरक्षण भिंती,ममुराबाद-प्रजापतनगर रस्ता कॉंक्रीटीकरण, ब्रीज, पेव्हर ब्लॉक आदी कामांचा सपाटा लावून परिसराचा चेहरा मोहराच बदलवून टाकला आहे.लहान बालगोपाळांसाठी ३२लाख रुपयांचे क्रीडांगण,२५लाखाचे पेव्हर ब्लॉक, आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा यक्ष प्रश्न मार्गी लावला आहे.रोटरी क्लबच्या माध्यमातून स्मशानभूमीची सोय नागरिकांना करुन दिली आहे. सध्या स्थितीत २ कोटी रुपयांचे  विकास कामे झाल्याने रहिवासी जाम खुश झाले आहेत.अक्षरक्ष:१६ ते १७ वेळा बाविस्कर दाम्पत्याचा सत्कार सोहळा जनतेने विविध कार्यक्रमांतून केला आहे. कांचन नगर परिसरात मध्ये श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात नगरसेवक किशोर बाविस्कर व सौ.उज्वलाताई किशोर बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला आहे .या सत्कार सोहळ्यास संजय ओकासरे, हिरालाल वाणी, भगवान चौधरी, रमेश चौधरी, भागवत सोनवणे,सौ.मीनाताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ४००ते ५०० महिलांस शेकडो लोकांचा जनसमुदाय  उपस्थित होता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने