मौजे भेडाळा गावात प्रधानमंत्री आवास योजनेत तब्बल २३८लाभार्थी वंचित
घनसावंगी जि. जालना दि.३०*( प्रतिनिधी कैलास पवार) केंद्र शासनाची महत्वकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेच्या कामात तब्बल २३८लाभार्थी यांना लाभ नाकारण्यात आला असल्याचे मौजे भेडाळा येथील ग्रामस्थांनी घनसावंगी चे गटविकास अधिकारी प्रदीप कदम यांना निवेदाद्वारे कळविले आहे.सदरच्या यादीत फार मोठा अनुशेष असल्याने खरे लाभार्थी या चांगल्या योजेनेला मु कले आहे अशी खंत व्यक्त केली जात आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सुचीच्या निकषानुसार २३८ पैकी अनेक लाभार्थी हे निकषांत बसत आल्याने त्यांना लाभ मिळणे उचित आहे यासाठी गटविकास अधिकारी यांनी संबंधित प्रकारांचा योग्य तो अहवाल मागवून सामाजिक व आर्थिक मागासलेले लोकांना नूतन यादीत नाव समाविष्ट करून अभिप्रेत यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी भेंडाळा येथील बाबु राव राठोड मा. सरपंच,गुलाब चव्हाण शिवराम राठोड,विलास जाधव,शामराव राठोड,रामराव राठोड, बाळू राठोड,वसंत आसाराम,तुकाराम किसन,सर्जेराव जाधव,राजाराम राठोड,नितेश जाधव,रवींद्र राठोड, लहू राठोड,सीताराम शाहू,गोरख सीताराम,दिलीप बाबुराव,बाबसाहेब मोहन,गुलाब चवहान,गणेश राठोड,प्रकाश गणपत,प्रेमचंद खेमा,भानुदास तुकाराम,अमर राठोड,भारत राठोड,अलका उमेश, सतिश राठोड व अन्य ग्रमस्थच्या निवेद न करताना स्वाक्षरी आहेत.