चोपड्यात 1 मे रोजी स्वामी गोपालानंद सरस्वती महाराज दर्शन सोहळा
*चोपडा*दि.३०(प्रतिनिधी)- महान क्रांतिकारी व गोभक्त संत, संत श्री जगदीश गोपालजी उर्फ स्वामी गोपालानंद सरस्वतीजी महाराज यांचा मंगल प्रवेश व दर्शन सोहळा चोपडा येथे दिनांक 1 मे 2022 रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व गो अनुसंधान संस्था चोपडा यांचे द्वारे संस्थेचे अध्यक्ष श्री देवकांत के चौधरी यांनी केले आहे.