आदिवासींच्या पाड्या वस्त्यांमध्ये गुंजणार नांव "संजूभाऊ शिरसाठ " तर कायापालटाचे खरे शिल्पकार आमदार सोनवणे दाम्पत्य*..


 **आदिवासींच्या पाड्या वस्त्यांमध्ये गुंजणार नांव "संजूभाऊ शिरसाठ " तर कायापालटाचे खरे शिल्पकार आमदार सोनवणे दाम्पत्य*.. 

खरं पाहिलं तर  दिव्यांंग व्यक्तींस कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता असते..मात्र काही दिव्यांग व्यक्तीं मोठ्या साहसाने नवीन विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात..अन् त्यात यशस्वीही होतात.. अन् "पंगूम् लंगयते गिरी"सत्यात उतरते तेव्हा धडधाकट माणसाच्या अंगावर शहारे आल्यासारखी क्षण निर्माण होतात.. असाच प्रत्यय संजयभाऊ शिरसाठ यांच्या माध्यमातून  तालुक्यांतून एक आदर्श डोळ्यांसमोर उभा राहतो.शारिरीक परिस्थिती मजबूत नसतांना आदिवासी पाड्या वस्त्यांमध्ये फिरणे, तेही तेथील भरकटणारा गोरं गरिब समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपड म्हणजे मानवतेची ज्योत तेवत ठेवण्याचा  प्रयत्न . अन् हा प्रयत्न करणे म्हणजे खरा माणूस म्हणून जगण्याचा शिक्का मोर्तब आहे.नाहितर "जन्माला आला हेला आणि पाणी भरतं भरतं  मेला" असं जीवन हे जीवन नसून मेल्याल्या शरिरासमान आहे.म्हणून संजयभाऊ शिरसाठ यांनी    वडिल समाजवादी नेते साथी  कै.पांडूरंग नारायण शिरसाठ ऊर्फ "पांडूबापू"  यांचे समाज व सामाजिक कामात केलेले योगदान तालुका न विसरणारा आहे.आदिवासी बांधवांचे वनहक्क साठी १९७२ ला कै. दा .का. केंगे,कै पांडुरंग शिरसाठ हे जिवनभर सरकार सोबत लढले. आता त्यांचा वारसा संजीवभाऊ पांडुरंग शिरसाठ हे चालवत आहे. आदिवासी यांना वनजमीन मिळावी यासाठीआमदार  सौ. लताताई सोनवणे  व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे  हे प्रयत्नशील आहेत. . कै. पांडूबापूं यांची समाजसेवेची  तिच ज्योत तेवत ठेवण्याचे काम त्यांचे मुलं संजीव, महेश व कैलास हे करीत आहेत.त्यांना साथ लाभते ती लोकनायक म्हणून पात्रं असलेलें कार्य सम्राट कुशलवंत ,मुरब्बी समाज हितोपयेशी धडाकेबाज लोकप्रतिनिधी माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे व कार्यसम्राट आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांची.या उभय दाम्पत्याच्या अनमोल सहकार्याने आदिवासी भागाचा व आदिवासी जमातींचा प्रचंड प्रमाणात बदल होत आहे.न भूतो न भविष्यति.असा कायापालट होतों आहे त्यानिमित्त  अण्णासाहेब  व ताईसाहेब यांनाही मनापासून सॅल्युट..!

चोपडा तालुक्यात सातपुडा डोंगर व त्यालागून क्षेत्रात पावरा आदिवासींची मोठया प्रमाणात वस्ती आहेत..अनेक वस्त्या वर्षानुवर्ष दुर्लक्षित होत्या.. *माननीय. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार ताईसो लताबाई सोनवणे* यांच्या सहकार्याने संजूभाऊंनी जणू आदिवासी क्षेत्रात सर्व सुविधा पुर्ण करायचा विडाच उचललेला आहे.. माननीय आमदारांची *विकासाची घोडदौड चोपडा तालुक्यात न भुतो न भविष्यते सुरू आहे * त्या संधीचा फायदा घेत संजूभाऊंनी कित्येक वर्ष विकासापासून दुर असलेल्या वस्त्या,पाडे व गावात ऊन,वारा,पाऊस,रस्ता याचा विचार न करता स्वत: दिव्यांग असून सुध्दा रस्ते नसतांना उन्हातान्हात पायपीट करून प्रत्येक वस्त्या शोधून काढून तिथल्या समस्या जाणून घेवून  *मान कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व मान आमदार ताईसो लताबाई सोनवणे * यांनाही सोबत घेवून वाड्या वस्तीत फिरवून सर्व विकासाची कामे पुर्ण करून घेत आहेत…कार्यकर्ता कसा असला पाहिजे..? तर त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे संजूभाऊं..!!!

*संजूभाऊंच्या कार्याला व माननीय माजी आमदार आण्णासो चंद्रकांत सानवणे व माननीय आमदार ताईसो लताताईंना माझा त्रिवार मुजरा…*

 *लेखक:- सोमनाथ* *देवराजगुरुजी

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने