*अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता.. पालकांच्या शोधा शोध नंतरही सापडेना.. अखेर पोलिसात गुन्हा..*
भुसावळ दि.२६(प्रतिनिधी)
भुसावळ शहरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील एका कॉलनी परिसरात अल्पवयीन मुलीच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात तरुणांनी घरात प्रवेश करुन अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले.याप्रकरणी सदरील मुलींचे पालकांनी मुलीचा नातेवाईक व मित्रमंडळीकडे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्याअनुषंगाने पोलिस अधिकारी अंबादास पाथरवट हे अधिक तपास करीत आहेत.