*सहाय्यक पोलिस उप निरीक्षकास १० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक.. पोलीस डायरीतून माय लेकींचे नाव कमी करण्यासाठी ४० हजारांची मागणी..* *खान्देशात अन्टीकरप्शन विभागाचा जोरदार जोश... नोकरी व्यतिरिक्त पैसा घेणाऱ्यांचे उडतायं होश..!*

 

*सहाय्यक पोलिस उप निरीक्षकास १० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक.. पोलीस डायरीतून माय लेकींचे नाव कमी करण्यासाठी ४० हजारांची  मागणी..* *खान्देशात  अन्टीकरप्शन विभागाचा जोरदार जोश... नोकरी व्यतिरिक्त पैसा घेणाऱ्यांचे उडतायं होश..!*

नाशिक दि.२६ (प्रतिनिधी):सटाणा तालुक्यातील नामपूर पोलिस स्टेशनममध्ये सहाय्यक पोलिस उप निरीक्षक जगन्नाथ लाला महाजन (वय 57 वर्ष)यांना माय लेकींचे नाव एका गुन्ह्यातील पोलिस डायरीतून कमी करण्यासाठी   40 हजार 600/- रुपयांची मागणी केली त्यापैकी पहिला हप्ता १०हजार रुपयांची लाच घेताना लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सध्या खान्देशात अन्टीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या  जोरदार कारवाया सुरू असल्याने लाच घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

      
याबाबत प्राप्त माहिती अशी,
     यातील तक्रारदार पुरुष, वय -  32 वर्षे यांची आई-वडील व दोन्ही बहीण अशा पाच जणांविरुद्ध नामपूर  दूरक्षेत्र, ता.सटाणा येथे भा.द.वि. कलम 498 (अ), 323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल असून त्यात तक्रारदार यांची आई व दोन्ही बहिणी यांची नावे गुन्ह्यातून कमी करणेसाठी सपोउपनि जगन्नाथ लाला महाजन, वय 57 वर्ष, व्यवसाय-नोकरी, नेम.जायखेडा पोलीस स्टेशन, नामपूर दुरक्षेत्र, ता. सटाणा, जि. नाशिक  यांनी 40हजार 600/- रुपयांची लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता 10000/- रु.नामपूर दूरक्षेत्र, ता.सटाणा* येथे पंच साक्षीदारांसमोर स्विकारतांना आहे.  लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून  ताब्यात घेतले  असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई सापळा मार्गदर्शक अधिकारी श्री. सुनील कडासने , (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक. ),. श्री. नारायण न्याहाळदे (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परीक्षेत्र, नाशिक.) श्री. सतीश भामरे (पोलीस उपअधीक्षक (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.) यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा पर्यवेक्षण अधिकारी राकेश आ. चौधरी, (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार) सापळा अधिकारी
पोलीस निरीक्षक, समाधान म. वाघ ( ला.प्र.वि., नंदुरबार) यांनी सापळा रचून जोरदार कारवाई केली.
याकामी पोह/उत्तम महाजन, पोहवा/विजय ठाकरे, पोना/ देवराम गावित व पोना/मनोज अहिरे सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार या सापळा  पथकाने सहकार्य केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने