श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान तर्फे परेल येथील दामोदर नाट्यगृहात शनिवारी "नमन"चे आयोजन




 श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान तर्फे परेल  येथील दामोदर नाट्यगृहात शनिवारी  "नमन"चे  आयोजन                                           

मुंबई दि.०२(शांताराम गुडेकर ):कलेचे  माहेरघर म्हणून  संबोधल्या जाणाऱ्या "कोकणातील" प्रत्येक कोकणी माणसाला वेड लावणारी,कोकणी कलेचा नावीन्यपूर्ण साज आणि बदलत्या काळानुसार पुरुष पात्रमय नमन कलेत कालपरत्वे बदल होत,"व्यावसायिक "स्त्री-पुरुष" पात्रांनी" नटलेली वैशिष्ट्यपूर्ण लोककला "कोकणचे खेळे-अर्थात  नमन"असा सदाबहार कार्यक्रम मुंबईस्थित कोकणी माणसाला शनिवार  दि.५ मार्च २०२२ रोजी मुंबईच्या परेल येथील दामोदर नाट्यगृहात रात्री ८ वाजता  कुटुंबसमवेत पहायला मिळणार आहे.कोकण सुपूत्र,कलेच्या प्रवाहात आपली ओळख निर्माण करून,लोककला जतन-संवर्धन करणारे कलावंत शाहीर राजेंद्र कृष्णा टाकले निर्मित  आणि गोसावी कृपा नमन कलामंच सोनगिरी प्रस्तुत  यांचे "स्त्री-पात्रांनी" नटलेलं  नमन ( कोकणचे खेळे )अशी नाविन्यपूर्ण कलाकृती सादर होणार आहे.पारंपारिक खेळे,भक्तिमय गण,नटखट गवळण सोबत नव्या संल्पनेतून साकारलेली,सध्यस्थीत परिस्थितीवर आधारित सामाजिक संदेश देणारी नाट्य कलाकृती,( वगनाट्य ) न"मान अंगावर आलाय" प्रेक्षकांची मन जिंकून जाणार आहे.सुंदर नृत्य कलाआविष्कार,उत्तम काव्य रचनेतून साकारलेली नव-नवीन कर्णमधुर आणि सुमधुर गोड आवाजाचे लोकप्रिय शाहीर रविंद्र भेरे सह शाहीर विनेश टाकले,पार्श्‍वगायिका शिवण्या मांडवकर यांच्या मधुर आवाजातून गायली जाणारी गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहेत.कार्यक्रमाचे लेखक/गीतकार शाहीर राजेंद्र टाकळे,दिग्दर्शक  शाहीर प्रविण कुळये,सूत्रधार -संजय मांडवकर,मृदूंग /ढोलकी - विशाल मांजरेकर,ऑर्गन-महेंद्र फटकरे,बेन्जो-सुरज वेले, ऑक्टोपॅड - स्वप्नील गुरव आणि नमन मंडळाचे "पुरुष-महिला" कलाकार यांच्या ताफ्यात हा सदाबहार कार्यक्रम मुंबई रंगभूमीवर मोठ्या जल्लोषात व श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे नेत्रदीपक नियोजनबद्ध आयोजनात कोव्हिड -१९ च्या नियमांनुसार संपन्न होणार आहे.कार्यक्रमच्या अधिक माहितीसाठी संजय मांडवकर-७२०८६०२१३०/राजेंद्र टाकले -९५९४६८९५५४/प्रविण कुळये -९०८२१५४५४१/प्रदीप गुरव -७६६६६२६८०५/महेंद्र फटकरे -९६१९६९४९७८/सुजिंद्र घेवडे -९६५७०१२१७६/सुनील डावल-७५०६७३४६६५/सत्या जठयार  -९८७०६७२७९०यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने