*चोपड्यात महावीर नगरात महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद.. दाते संदीप सावळे सरांनी दिले ७१ हजारांची देणगी.. सामाजिक कार्यकर्ते मेहमूदभाई बागवान, अनिल तांबेकर,व आसिफ* *बागवान यांचे कडून त्रिगुणी प्रसाद*
चोपडा दि.०१ (प्रतिनिधी) :चोपडा शहरातील महावीर नगर परिसरातील महादेव मंदिर उभारणीसाठी पावन भूमीवर महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद भंडारा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने सोत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी महा दाते श्री.संदीप सावळे सरांनी ७१ हजार रुपयांची देणगी देऊन मंदीर बांधकामासाठी योगदान दिल्याने त्यांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार अभिनंदन करण्यात आले.शिवाय साबुदाणा खिचडी,केळी व द्राक्षांचा महाप्रसाद देणाऱ्या दात्याचेही आभार व्यक्त करण्यात आले.
आज, दि 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रिचे औचित्य साधून भगवान महादेवाची प्रतिमा पुजन करुन संपुर्ण भारत वासियांचे आरोग्य चांगले राहो ,सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात आली . महाप्रसादासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिलभाऊ तांबेकर यांनी साबुदाणा खिचडी, सामाजिक कार्यकर्ते मेहमूदभाई बागवान यांचे तर्फे १ हजार ०१ केळीचे तर सिमला फ्रूटचे आसिफभाई बागवान यांच्याकडून द्राक्षे असा त्रिगुणी महाप्रसाद देण्यात आला.यात सर्वधर्म समभावतेचा मेळ घातला गेल्याने कार्यक्रमात मोठा भक्ती भाव दिसल्याने "हम सब एक है" ची प्रचिती आली.महाशिवरात्रीचे औचित्य साधत महा दाते श्री.संदीप सावळे सरांनी सपत्नीक आपल्या कुटुंबियांसमवेत ७१ हजार रुपयांची भरीव देणगी पत्रकार महेश शिरसाठ यांच्याकडे देऊन मंदीर बांधकामासाठी मोलाचे योगदान दिले.
यावेळी बांधकाम कॉन्टॅक्टर श्री.सोपान मराठेसर, श्री.शाम बडगुजरसर, श्री.डॉ.रविंद्र बडगुजर, श्री.देवरेसर, श्री.गोपाल झिपरू मराठेसर, श्री. भटूशेठ सोनारसर,श्री.भारत राजपूतसर, श्री.रवींद्र रामदास बडगुजरसर, श्री.रतिलाल बडगुजरसर, श्री.भटूशेठ बडगुजर श्री.आप्पा मासरेसर, श्री.प्रमोद पाटील सर, श्री.राजेंद्र बडगुजरसर, श्री.देवांगसर,श्री.प्रा.पियुष चव्हाण श्री.प्रकाश चौधरीसर, श्री.प्रवीण राजपूत, श्री.सुरेश पाठकसर, श्री.गणेश पाटीलसर, श्री.सुमित सोनारसर, श्री.रोहित सोनारसर, श्री.उत्तम पाटीलसर ,श्री.चेतन देवरेसर श्री.रणछोड लोहारसर, श्री.कैलास शिरसाठसर, श्री.स्वप्नील साळुंखेसर श्री.दीपक तायडे, श्री.गणेश सोनार, श्री.पंकज पाटील, श्री.किरण लोहार , श्री.प्रफुल्ल पाटीलसर ,श्री.रितेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.श्री.पियुष चव्हाणसर,भावेश सोनवणे,प्रणव राजपूत,शुभम साळुंखे, भैय्या सावळे, सुनील सोनवणे,बंटी बडगुजर,चेतन राजपूत,शिव मराठे, हरिओम बडगुजर,निखिल बडगुजर आदिंची मेहनत घेतली.यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित होता.