*सप्तरंग मराठी चॕनेल तर्फे साईसुंदर हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुशीलकुमार नवसारे यांचा "आरोग्य सेवा रत्न पुरस्काराने"गौरव..* *सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान..कोळी समाज बांधवच्यावतीने सत्कार*
धुळे दि.०१(प्रतिनिधी )सप्तरंग मराठी चॕनेल तर्फे दि.२७ फेब्रुवारी रोजी धुळ्याचे नामांकित साईसुंदर हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुशीलकुमार नवसारे यांना आरोग्य सेवा रत्न पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे . सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यंदाचा पुरस्कार सोहळा हा हॉटेल झंकार पॅलेस मध्ये "होणारं सून मी ह्या घरची" फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांच्या हस्ते डॉ.सुशील नवसारे ह्याचा यथोचित गौरव करण्यात आला.डॉ.नवसारे यांचे मनोभावे केलेली रुग्ण सेवा पाहून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या गौरवाचे अनुषंगाने कोळी समाज बांधवच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.याप्रसंगी कोळी समाज कार्यकर्ते श्री.गिरधर आप्पा महाले,श्री.देविदास नवसारे, श्री.दिलीप बागुल, श्री.अरुण वाघ, श्री.वसंत जाधव,श्री.मनोज सरगर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते