श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित ग्रामदैवत कांडकरी देव मंदिर उदघाटन सोहळा,प्राण प्रतिष्ठापणा, वास्तुशांती ,कलशारोहनचे आयोजन

 






श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित ग्रामदैवत कांडकरी देव मंदिर उदघाटन सोहळा,प्राण प्रतिष्ठापणा, वास्तुशांती ,कलशारोहनचे आयोजन

मुंबई दि.१९ (शांताराम गुडेकर ):  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.कासारकोळवण येथील श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित ग्रामदैवत श्री कांडकरी देव मंदिर उदघाटन सोहळा,प्राण प्रतिष्ठापणा, वास्तुशांती ,कलशारोहनचे आयोजन शके १९८३ मिती फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी ते नवमी गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ ते शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ कालावधीमध्ये परमपूज्य स्वामी श्री उल्लासगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली वेदोक्त, शास्तोक्त , व निशांत ब्रम्हवृद यांच्या  शुभहस्ते संपन्न  होणार आहे.या  कार्यक्रम प्रसंगी खाजदार विनायकजी राऊत , माजी राज्यमंत्री रवींद्र माने , आमदार शेखरजी निकम सर , माजी आमदार सुभाष जी बने , माजी आमदार सदानंद चव्हाण , रोहन बने, प्रमोद पवार , प्रमोद आढटराव, रुपेश कदम, अमित केतकर, जयशिंग माने , मुग्धा जागुष्ठे, उद्योजक विष्णू रामाणे, ठेकेदार लक्ष्मण अलसुंदे , पंचायत समिती सदश्या शितलताई करंबेळे व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच  गावच्या सरपंच मानसी करंबेळे  , उपसरपंच प्रकाश तोरस्कर , पोलीस पाटील महेंद्र करंबेळे,व मंडळाचे पदाधिकारी व तमाम ग्रामस्थ ह्यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी रात्री १० वा. लोककलेतून समाजप्रबोधन  " आम्ही कुणब्याची पाखरे"हा कार्यक्रम होणार आहे.तरी आपण सर्व मित्र मंडळी सहित उत्सवात सहभागी होऊन आम्हचा आनंद दुगुणीत करावा असे आवाहन आयोजकांतर्फे  करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने