*चोपडा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा आमदार लताताई सोनवणे यांचे आवाहन*
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड मार्फत व शेतकी संघ चोपडा यांच्या संयुक्त हरभरा खरेदी शुभारंभ आज दिनांक १९ /०३/ २०२२ रोजी दुपारी तीन वाजता आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी जिप सदस्य हरिश पाटील माजी उप नगरअध्यक्ष विकास पाटिल तालुका संघटक सुकलाल कोळी युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी नरेंद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर अहिरे,धिरज गुजराथी प्रताप पाटील योगेश पाटील हरिष पवार ज्ञानेश्वर अहिरे, शेतकी संघाचे चेअरमण दुर्गादास पाटील बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील संचालक सुनिल पाटील शेखर पाटील शेतकी संघाचे सचिव राहुल पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते नाफेड खरेदी बाजार भाव रुपये ५२३० राहील तसेच सर्व शेतकरी बांधवांचा हरभरा संपूर्ण खरेदी केला जाईल याची ग्वाही दिली चोपडा तालुक्यात नाफेड मार्फत खरेदी सुरू झालेली आहे,ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीमाल खरेदी केंद्रावर आणावा असे आव्हान आमदार लताताई सोनवणे यांनी केले