*बी. फार्मसी महाविद्यालय, चोपडा येथे एक दिवसीय ट्रेनिंग सेशन यशस्वीरित्या संपन्न*
चोपडा दि.,१९( प्रतिनिधी )महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फ़े ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या अंतर्गत एक दिवसीय Training Session चे यशस्वीपणे आयोजन दिनांक 12 मार्च 2022 या रोजी सकाळी 10 वाजेला महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये तर 13 मार्च 2022 या रोजी सकाळी दहा वाजेला ऑनलाईन पद्धतीने गूगल मीट माध्यमाद्वारे करण्यात आले. ट्रेनिंग Session ला आमंत्रित प्रमुख वक्ते प्रणाली सुर्वे, General Manager (Operations),Vexxa Life Sciences, Mumbai यांच्याद्वारे "Regulatory Affairs " या विषयावर सविस्तर चर्चा उपस्थित विद्यार्थ्यांसोबत करण्यात आली. Pharmaceutical कंपनीत RA Department मध्ये होणारे कामकाज, Documentation व या संबंधित असलेले नवीन कायदे व नियम याचे उत्तम प्रशिक्षण विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दरम्यान देण्यात आले. दिनांक 13 मार्च 2022 या रोजी "Interview Preparation " या विषयावर आयोजित असलेल्या ट्रेनिंग सेशनमध्ये अल्मित्रा सोमाने यांच्याकडून session मध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना Job साठी देण्यात येणाऱ्या मुलाखतीत येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निवारण व अधिक उत्तम मुलाखत कशी देता येईल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य. डॉ.जी पी वडनेरे यांच्या हस्ते झाले तर देण्यात आलेल्या ट्रेनिंग सेशन चा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात होईल व यशस्वी जीवनाच्या वाटचालीकडे त्यांचे पदक्रमन होईल असे प्रास्ताविक पर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांनी व्यक्त केले. सदरच्या session च्या आयोजनाची जबाबदारी प्रा. सौ क्रांती पाटील (Placement Officer) व प्रा.सौ प्रेरणा एन.जाधव (Training Officer) यांनी यशस्वीरित्या पार पाडली. Virtual Training Session मध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रा. सौ क्रांती पाटील यांनी आपल्या शब्द सुमनांनी केले तर Session ची सांगता प्रा.सौ प्रेरणा जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.सभेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदरच्या सभेच्या यशस्वितेकरिता महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष सौ. आशाताई पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदिप पाटील यांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयचे प्रबंधक,समितीचे सदस्य, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वांच्या सहकार्याने सभा प्रभावीपणे संपन्न झाली.