*चोपडा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या समन्वयकपदी छोटु वारडे*



 *चोपडा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या समन्वयकपदी छोटु वारडे*

चोपडा  दि.१२ (प्रतिनिधी) शहरातील नामवंत छायाचित्रकार व शासनाने गौरविलेले कोरोना योद्धा छोटु उर्फ भगवान भावलाल वारडे यांची चोपडा म.सा.प.शाखेच्या समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकित मानपत्र देवुन वारडे यांना नुकतेच म.सा.प.चे जिल्हा संचालक तानसेन जगताप,चोपडा शाखेचे  संस्थापक जेष्ठ कवी अशोक सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.छोटु वारडे यांनी ग्राहक मंच, आदिवासी भागातील बालकांचे कुपोषण,उत्कृष्ट छायाचित्रण, पत्रकारिता,व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केली आहे.शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग  नोदविला आहे.तालुक्यातील साहित्य,कला,क्रीडा सर्वच स्तरातील मान्यवर व पदाधिकार्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने