*महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नविन मंजुर वीज उपकेंद्राचा चिंचोली येथे उद्या भुमीपुजन सोहळा .. ऊर्जा मंत्री ना.डॉ. श्री. नितिन राऊत यांची आभासी पध्दतीने उपस्थिती*

 


*
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नविन मंजुर वीज उपकेंद्राचा चिंचोली येथे उद्या भुमीपुजन  सोहळा .. ऊर्जा मंत्री ना.डॉ. श्री. नितिन राऊत यांची  आभासी पध्दतीने उपस्थिती*

जळगाव दि.१२ (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कृषी धोरण- २०२० अतंर्गत  ३३ के.व्ही. उपकेंद्र चिचोली ता. जि.जळगाव येथे रविवार दि. १३.०३.२०२२ रोजी वेळ सकाळी ११:३० वाजता  नविन मंजुर वीज उपकेंद्राचे भुमीपुजन  सोहळा महावितरण तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

भुमीपुजन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  ना. डॉ. श्री. नितिन राऊत साहेब उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य (उपस्थिती आभासी पद्धतीने ) हे भूषविणार असून उद्घाटन  ना. श्री. गुलाबराव पाटील साहेब, मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगांव जिल्हा यांच्या शुभ हस्ते होणार आहे

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
श्रीमती रंजनाताई पाटील, (अध्यक्ष, जिल्हा परिषद, जळगांव)श्रीमती रक्षाताई खडसे लोकसभा सदस्य ,डॉ. श्री. सुधीर तांबे, विधानपरिषद सदस्य,
श्री. गिरीष महाजन विधानसभा सदस्य , श्री. शिरीषदादा चौधरी विधानसभा सदस्य, श्री. अनिल पाटील विधानसभा सदस्य,
श्री. चंदुलाल पटेल विधानपरिषद सदस्य, श्री. संजय सावकारे विधानसभा सदस्य मा. श्री. सुरेश भोळे,विधानसभा सदस्य
श्री. चंद्रकांत पाटील विधानसभा सदस्य,श्रीमती लताताई सोनवणे विधानसभा सदस्य, श्री. उन्मेष पाटील लोकसभा सदस्य  श्री. किशोर दराडे विधानपरिषद सदस्य, श्री. चिमणराव पाटील विधानसभा सदस्य, श्री. किशोर पाटील विधानसभा सदस्य,श्री.मंगेश चव्हाण विधानसभा सदस्य श्री. अभीजित राऊत, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, जळगांव,श्री. डॉ.पंकज आशिया, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, हे मान्यवर विशेष उपस्थिती देणार आहेत

  सदर सोहळ्यास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. कैलास हुमणे मुख्य अभियंता, जळगांव परिमंडळ,
मो. फारुख शेख अधिक्षक अभियंता, जळगांव मंडळ,
श्री. रमेशकुमार पवार कार्यकारी अभियंता (प्र) जळगांव विभाग,
श्री. अनिरुध्द नाईकवाडे कार्यकारी अभियंता (स्था) जळगांव विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने