चोपडा तालुक्यात उद्या हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ व ३ मोठ्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा.. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते*


*चोपडा तालुक्यात उद्या हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ व ३ मोठ्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा.. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते*


चोपडा दि.१८(प्रतिनिधी) चोपडा येथे केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ उद्या दि. १९/०३/२०२२ शनिवार रोजी दुपारी २:००वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा येथे मा.आ.लताताई सोनवणे,यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पुजन होणार आहे.
तरी शेतकरी बांधवांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
दरम्यान मा.आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा) यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचा भुमिपुजन सोहळा
मा. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार, चोपडा विधानसभा) यांच्या शुभहस्ते व प्रमुख अतिथी : मा.प्रा.श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार, चोपडा विधानसभा तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या उपस्थितीत होत आहे त्यात
१) विटनेर ते वाळकी दरम्यान ३ पुलांचे बांधकाम करणे.२७५.०० लक्ष (दोन कोटी पंच्याचर लाख रु.)
२) हातेड बुधगांव दरम्यान ७.१०० कि.मी रस्त्याची सुधारणा करणे.२५०.०० लक्ष (दोन कोटी पन्नास लाख रु.)
३) गलवाडे फाट्याजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे.
३०.०० लक्ष (तीस लाख रुपये)अशा तीन कामांचा शुभारंभ दुपारी ४ते ५ वाटेच्या दरम्यान होत आहे
तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिवसैनिकांनी, पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने