चौगाव वन विभागात वन्य प्राण्यांसाठी "वाटर होल"ची व्यवस्था

 



चौगाव वन विभागात वन्य प्राण्यांसाठी "वाटर होल"ची व्यवस्था

चौगावं ,ता.चोपडा ( प्रतिनिधी विश्राम तेले)दिवसेंदिवस वाढणारे तापमान,व वन विभागात होणारे पाण्याचे दुर्भिक्ष आणि पाण्यासाठी वन्य प्राणी व पक्षांची तहान भागवण्यासाठी यावल उपवन विभागातील चोपडा वनक्षेत्रात लासुर राऊंड मधिल मामलदा बीट मध्ये श्रीक्षेत्र त्रिवेणी मंदिर चौगाव परीसरात "वाटर होल" ची निर्मिती करण्यात आली.हा वाटरहोल बनवतांना चोपडा वनक्षेत्रपाल,लासुर राऊंडच्या वमपाल सिमा पटाईत,वनरक्षक गोपाल देवरे,सिमा भालेराव,चौगाव वन व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष विश्राम तेले वन्यजीव संस्थेचे कुशल अग्रवाल ,वन मजूर व वनकर्मचारी यांनी श्रमदान केले.या वाटर होल ने तापणार्या उन्हाळ्यातही प्राणी व पक्षांची तहाण भागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने