कु.डॉ. प्रणाली खडसे हीची घांटजी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती
राळेगाव दि.१९( तालुका प्रतिनिधीधिरज खेडेकर)यवतमाळ जिल्ह्यातील घांटजी येथील रहिवासी असलेले शिक्षक अशोकराव खडसे यांची कन्या कु.डॉक्टर प्रणाली खडसे हीची ग्रामीण रुग्णालय घांटजीयेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून या पदावर नियुक्ती झाल्याने खडसे व भोयर कुटुंबातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घांटजी तालुका हा आदिवासी मतदारसंघात येत असुन कु.प्रणाली खडसे हीने ग्रामीण भागातील घांटजी सारख्या गावात १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे S.M.T वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे M.B.B.S ची पदवी प्राप्त केल्यानंतर कु.डॉ. प्रणाली हीने त्याच कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आपली १वर्षाची ईंटरनशीप २०२१ मध्ये पुर्ण केली व ती आता आपल्या मुळ गावीच म्हणजे जीथे तीने १२वी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले त्याच गावी घांटजी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी म्हणून कु.प्रणाली हीची नियुक्ती झाली असल्याने खडसे परीवार व विलासराव भोयर सर यांची भाची असल्याने या दोन्ही कुटुंबातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया
मी ग्रामीण भागातील शिक्षण घेवून पुढे गेली आहे माझी एक जिद्द होती की माझा तालुका हा आदिवासी मतदारसंघात येत आहे आणि मला एक डॉक्टर म्हणून माझ्या परिसरातील नागरिकांची सेवा करायची होती ती आजा खऱ्या अर्थाने पुर्ण झाली मी स्थानिकची कन्या असल्याने मी माझ्या परिसरातील येणाऱ्या प्रत्येक रुग्णांनाची चांगल्याप्रकारे सेवा करीन हा माझा धर्म आहे.
कु.डॉ. प्रणाली अशोकराव खडसे शिक्षक घांटजी