देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे भगतसिंग देशभक्त होते- डॉ.सी. एस.पाटील

 


देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे भगतसिंग  देशभक्त होते- डॉ.सी. एस.पाटील

भडगाव दि.२५(प्रतिनिधी) -स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान देऊन शहीद झाले आहेत. इंग्रजानी भारतीय युवकांना खूप यातना दिल्या आहेत वी.दा.सावरकर,सुभाषचंद्र बोस,चंद्रशेखर आझाद, सुखदेव, भगतसिंग ,राजगुरू असे स्वतंत्र सेनानी होऊन गेले आहेत.त्यांची  निष्ठा अखंड भारत साठी होती.या वीरांचे बलिदान प्रत्येक युवकां साठी प्रेरणा देणारे आहे असे विचार प्रा डॉ चित्रा पाटील यांनी व्यक्त केले.ते शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा इतिहास सांगत होते. प्रमूख पाहुणे म्हणून प्रा. डॉ संजय भैसे व कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा एस. आर.पाटील होते.

       कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमा चे सूत्र संचलन प्रा सुरेश कोळी यांनी तर आभार प्रा.रचना गजभिये यांनी मानले कार्यक्रमासाठी प्रा.एल.जी.कांबळे,प्रा.डॉ.दीपक मराठे,प्रा. डॉ सचिन हडोलतिकर, प्रा गजानन चौधरी,प्रा. डॉ बी. एस.भालेराव, प्रा. डॉ.ए.एम. देशमुख संदीप केदार,चौधरी तुळशीराम महाजन,एन.एस एस.चे स्वयमसेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने