अकोला बाजार येथे हवामान तज्ञ पंजाब डक यांचे शेतकरी मार्गदर्शन मेळावा..शेतकर्यांना मोलाचे मार्गदर्शन
अकोला बाजार दि.२५(प्रतिनिधी प्रवीण राठोड): येथे राजनशेष कृषी सेवा अॅण्ड ट्रेडर्स यांचे वर्षपूर्ती निमित्ताने शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्याचे आयोजन डाखोरे सेलेब्रेशन हॉल मध्ये घेण्यात आले. यावेळी हवामान तज्ञ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी पिकाची काळजी कशी घेतली जातात, हवामानात बदल झाल्यास उपाय कोणता घ्यायचा तसेच छोट्या छोट्या गोष्टीतूनआपणच आपल्या शेतीचे कसे राखणदार होऊ, तसेच आभाळातून चमकणार्या विजेपासून कसे स्वतःचे संरक्षण करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे उपाध्यक्ष आरिफ बुधवानी,विनायकराव बोदडे, प्रमुख अतिथी प्रदीप देशमुख, संगीता सव्वालाखे, प्रफुल्ल कापसे, आदी तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते, आयोजक तथा राजनशेष कृषी सेवा अॅण्ड ट्रेडर्स चे संचालक सूरज शिंदे पाटील अकोला बाजार यांनी शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केल्याबद्दल गावातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.