*चोपडा शहरात मार्च" एंडींग"ला विकास कामांची जोरदार "स्टार्टींग".. २ कोटी ३० लाखांच्या रस्ता कामांचा भूमिपूजन सोहळ्याने आमदार* *सौ.लताताईंच्या जयजयकार..न भूतो न भविष्यति विकास कामांच्या मिसाईल धमाक्याने शिंतोडे उडविणाऱ्या विरोधकांची चूप्पी..!*

 

*चोपडा शहरात मार्च" एंडींग"ला विकास कामांची जोरदार "स्टार्टींग".. २ कोटी ३० लाखांच्या रस्ता कामांचा भूमिपूजन सोहळ्याने आमदार* *सौ.लताताईंच्या जयजयकार..न भूतो न भविष्यति  विकास कामांच्या मिसाईल धमाक्याने  शिंतोडे उडविणाऱ्या विरोधकांची  चूप्पी..!* ३० मार्चला उद्घाटन सोहळा


चोपडा दि.२५ (प्रतिनिधी)चोपडा विधानसभा मतदारसंघाचे धुरंधर कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व धडाकेबाज कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या अथक प्रयत्नांनी चोपडा शहराचा दमदार कायापालटास सुरुवात झाली आहे लवकरच चोपडानगरीचे नंदनगरीत परिवर्तन होणार आहे.दि.३०रोजी शहरात ७ सात रस्ता कामांचे तर एका पूलाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा होतं असून २ कोटी ३० लाखांच्या घरात निधी मंजूर झाल्याने शहर विकासाला मोठी गती मिळत असल्याने नगरवासियांमध्ये आमदारांचा जयजयकार केला जात आहे.


चोपडा शहरात आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा) यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा | दि. ३० मार्च २०२२, बुधवार रोजी त्यांच्या शुभहस्ते व

प्रमुख अतिथी कार्यसम्राट माजी आमदार .प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे

चोपडा शहरातील विविध भागात मंजूर.झालेल्या विकास कामे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे

१) प्र.क्र. ९ मध्ये अरुण नगर ते गणेश कॉलनी दरम्यान नाक्यावर पूल बांधणे.३३.०० लक्ष रु. (तेहतीस लाख रु.)

२) प्र.क्र.९ मध्ये पूर्णानंद अपार्टमेंटपासून ते विश्वासराव पाटील यांच्या घरापर्यंत गटारीसह रस्ता सेमी ट्रिमिक्स काँक्रिट करणे.३०.०० लक्ष रु. (तीस लाख रु.)

३) प्र.क्र.९ मध्ये दिनेश बाविस्कर यांच्या घरापासून ते रामदास भोई यांच्या घरापर्यंत रस्ता सेमी ट्रिमिक्स काँक्रिट करणे.२७.०० लक्ष रु. ( सत्तावीस लाख रु.)

४) प्र.क्र. १ मध्ये धर्मराज देशमुख यांच्या घरापासून ते मनोहर गंगाधर देशमुख ते आनंदराव देशमुख यांच्या घरापर्यंत गटारीसह रस्ता सेमी ट्रिमिक्स काँक्रिट करणे.३५.०० लक्ष रु. (पत्तीस लाख रु.)

५) प्र.क्र.२ मध्ये प्रकाश महाजन, सुरेश महाजन ते दशरथ महाजन आणि वासुदेव महाजन ते संजय कोळी यांच्या घरापर्यंत गटारीसह रस्ता सेमी ट्रिमिक्स काँक्रिट करणे.२०.०० लक्ष रु. (वीस लाख रु.)

६) प्र.क्र.२ मध्ये नंदु गवळी ते सरफराज तडवी ते पंढरीनाथ महाजन विकास बारी यांच्या घरापर्यंत गटारीसह रस्ता सेमी ट्रिमिक्स काँक्रिट करणे.३५.०० लक्ष रु. (पत्तीस लाख रु.)

७) प्र.क्र. ३ मध्ये अलकरी वाड्यापासून ते महादेव मंदिरापर्यंत रस्ता सेमी ट्रिमिक्स काँक्रिट करणे.३५.०० लक्ष रु. (पत्तीस लाख रु.)

८) प्र. क्र. ७ जैस्वाल यांच्या घरापासून ते गोपाल गवळी रस्ता घरापर्यंत रस्ता सेमी ट्रिमिक्स काँक्रिट करणे.१५.०० लक्ष रु. ( पंधरा लाख रु.)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने