अनधिकृत कुकर्माचे भांडाफोड करतेयं निनावी फोन व गोपनीय माहिती .. तोपर्यंत संबंधित अधिकारी ठरतायं "शोपीस".. जनावरांच्या खाण्या लायक भेसळयुक्त निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थांचे सेवन करतोयं मानव.. तरीही अन्नसुरक्षा अधिकारी अनभिज्ञच असण्याचे कारण काय..? जनतेत संतप्त सवाल
चोपडा दि.२५( प्रतिनिधी ):—तालुक्यातील बिडगाव गावापुढील कुंड्यापाणी रस्त्यावरील शेतात चारचाकी दोन गाड्यांमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांचा प्रकार निनावी फोन च्या आधारांवर उघड होऊन तीन वेगवेगळ्या विभागाच्या पथकाच्या चम्मूने रात्री कारवाई केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.जिह्यातिल अन्न प्रशासन विभाग सध्या निद्रिस्त असून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा माज वाढला आहे अनेक दुकानांमध्ये दुग्धजन्य पदार्थ ,किराणा व खाद्य तेल आदींमध्ये भेसळ वाढली असून अनेक वेगवेगळ्या आजारांनी डोके वर काढले आहे खोकला,घसा खवखवणे,छाती जळजळणे, पोटाच्या विकारांवर मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे .तरी लोकांच्या आरोग्याची हमी घेतलेल्या अधिकाऱ्यांनी नुसती खुर्ची तोडण्याशिवाय काहीच करीत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.या विभागाचा उहापोह दिवाळी किंवा अन्य एखाद दुसरी कारवाई केल्या वेळेस होतों अन्यथा कार्यालय आहे की नाही असाच प्रश्न निर्माण होत असल्याच्या तिखट प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.
चोपडा तालुक्यातील बिडगावजवळील कुंड्यापाणी रस्त्यावर काही संशयित दुधात पामतेल, पावडर टाकून भेसळ करत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली आहे. यात अडावद पोलिस ठाण्यातील पथकही होते. तिन्ही विभागांचे ४० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी सदर कारवाईच्या वेळी उपस्थित होते. दरम्यान दुधाचे स्टिलचे ५० कॅन, तुपाचे ४० कॕॅन, दोन इन्व्हर्टर,दुध पावडर दोन मिक्सर, दोन बोलेरो वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भेसळ केलेले दूध फैजपूर येथे असलेल्या भरूचच्या दूध डेअरीमध्ये आणले जात होते. तेथून ते जळगावमध्ये आणत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, भेसळीचा गोरखधंदा कुणाला कळू नये म्हणून रात्री हा प्रकार सुरु होता.असे एक ना अनेक प्रकार सुरू आहेत.कुणी कळविले तर असा प्रकार उघडकीस येतो नाहितर असा भयावह प्रकार सुरूच राहतो.मग असले प्रकार शोधून काढण्याची जबाबदारी कोणाची?हाही प्रश्न उपस्थित होतो.तुकाराम मुंडे यांच्या सारखें कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांचा फौज या देशात निर्माण होणे गरजेचे आहे. मागे चार महिने होऊनही अफूची लागवड कोणाच्या लक्षात आली नाही तेव्हा ही फक्त निनावी फोन द्वारे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हाभर खळबळ उडाली.मात्र तोपर्यंत कोणालाच थांग पत्ता नव्हता. असाच प्रकार आताही घडलाआहे.मात्र संबंधित अधिकारी स्वतः जातीने लक्ष घालून पथकांची नेमणूक करीत दर आठ दिवसांनी दुकानांची तपासणी का करीत नाहीत.? जर तपासणी मोहिम कायम राबविली गेली तर अनेक भेसळ करणाऱ्यांची दमछाक उडणार आहे.आजही मुक्या जनावरांना खाऊ घालण्या योग्य अन्नधान्य पदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे(पदार्थ) तळागाळातील माणसांचे आहारात दिले जात आहे.परिणामी मानवी जीवन अर्ध्यावर आलें आहे शंभरी ओलांडणारा मानव जेमतेम "साठी" पार करतोय त्यातही अनेक व्याधींचा सामना करीत तो चढ उतारांची शिडी चढत जीवनाची चव चाखतो आहे. या भेसळयुक्त जीवनात भेसळीला विराम घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांनी तरी वेळीच सावध होऊन मानवास भेसळी पासून वाचविल्यास मानवी आयुष्य निश्चितच वाढणार आहे.नाहितर या खड्ड्यात तेही कधी पडतील याचा भरवसा नाही.म्हणून वेळीच सगज होऊन स्वतःचे व इतरांचेही जीवन व्याधींपासून वाचणार आहे.याकरिता अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी भेसळ करणाऱ्यांच्या नांगी ठेचण्याची नितांत गरज आहे.