श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित ग्रामदैवत कांडकरी देव मंदिर उदघाटन सोहळा,प्राण प्रतिष्ठापणा, वास्तुशांती ,कलशारोहन सोहळा थाटामाटात संपन्न

 






श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित ग्रामदैवत कांडकरी देव मंदिर उदघाटन सोहळा,प्राण प्रतिष्ठापणा, वास्तुशांती ,कलशारोहन सोहळा थाटामाटात संपन्न 

मुंबई दि.२९ (शांताराम गुडेकर ) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.कासारकोळवण येथील श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित ग्रामदैवत श्री कांडकरी देव मंदिर उदघाटन सोहळा,प्राण प्रतिष्ठापणा, वास्तुशांती ,कलशारोहन सोहळा शके १९८३ मिती फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी ते नवमी गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ ते शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ या  कालावधीमध्ये परमपूज्य स्वामी श्री उल्लासगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली वेदोक्त, शास्तोक्त , व निशांत ब्रम्हवृद यांच्या  शुभहस्ते संपन्न  झाला.या  कार्यक्रम प्रसंगी सामाजिक,राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच  गावच्या सरपंच , उपसरपंच प्र , पोलीस पाटील ,व मंडळाचे पदाधिकारी व तमाम ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. विशेष आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी रात्री १० वा. लोककलेतून समाजप्रबोधन  " आम्ही कुणब्याची पाखरे"हा कार्यक्रम पार पडला.पंचक्रोशीतील अनेक रहिवाशी सर्व मित्र मंडळी सहित उत्सवात सहभागी होऊन सोहळ्याचा आनंद दुगुणीत केला.कांडकरी मंदिर उदघाटन सोहळा ,प्राण प्रतिष्ठापणा कळस मिरवणूक, रेकोर्ड डान्स कार्यक्रम उत्स्फूर्तपणे दिमाखात पार पडला म्हणून आयोजकांचे कौतुक केले गेले.निशांत ब्रम्हवृद वेदोक्त ,शास्त्रयुक्त उल्लास गिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली धार्मिक विधी उत्स्फूर्तपणे पार पडल्या याबद्दल कांडकरी विकास मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे कौतुक करण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम रेकोर्ड डान्स स्पर्धा , क्रीडा स्पर्धा, कळस दिंडी,तीन दिवस महाप्रसाद , जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ , मिरवणूक संपूर्ण गावात दिमाखदार पणे यशस्वी झाली. यामध्ये बेंजो पथक, तासेवाले वांजत्री , गावातील ग्रामस्थ ,महिला , गावच्या माहेरवाशीनी , पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.त्याही  मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाला सर्व पक्षातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट दिली व मंडळाचे कार्याबद्दल मंडळाचे कौतुक केले.कासार कोळवणच्या इतिहास मधील हा अदभुत असा सुवर्ण सोहळा संपन्न झाला. या  कार्यक्रमाला हजारो भाविकांनी भेट दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने