नशिराबदच्या बाबा ग्रुपतर्फे भव्यदिव्य आरोग्य शिबिर



 नशिराबदच्या बाबा ग्रुपतर्फे भव्यदिव्य आरोग्य शिबिर संपन्न

जळगाव दि.२९(प्रतिनिधी)  बाबा ग्रुप आणि न्यु भारत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मरहुम सैय्यद बिस्मिल्लाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कब्रस्थानाजवळील मनियार मोहल्ला येथे रविवारी भव्य रोगनिदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा परिसरातील शेकडो गोरगरीब, गरजुंनी लाभ घेतला. आरोग्य तपासणीनंतर औषधोपचारही करण्यात आले. आवश्यक त्या रूग्णांवर अत्यल्प दरात जळगाव येथे पुढील उपचार केले जाणार आहेत. 

या शिबिरात ईसीजी, मधुमेह, रक्तदाब, महिलांचे व बालकांचे आजार अशा विविध आजारांच्या रूग्णांची तपासणी करत औषधोपचार करण्यात आली.  ज्या रूग्णांना ऑपरेशनची आवश्यकता आहे अशांवर जळगाव येथे भास्कर मार्केट, स्वातंत्र्य चौक, एलआयसी ऑफिस समोरील न्यु भारत हॉस्पिटल येथे अल्पदरात पुढील उपचार केले जाणार आहेत. या रूग्णालयात सर्व प्रकारची ऑपरेशन, सिझर यांच्यावर 30 टक्के सुट आहे. अपेंडीक्स, हार्निया, बच्चेदानी व पोटातील गाठींच्या ऑपरेशन यासह विविध आजारांवर उपचार व ऑपरेशनचीही येथे सर्वोत्तम सुविधा आहे. 

शिबिरात डॉ.वशीर अन्सारी, डॉ.योगिता पाटील, डॉ.शौकत पाटील, डॉ.राहुल भीमराव, डॉ.एजाज शेख, डॉ.मोहसीन शेख, डॉ.इम्रान खाटीक, डॉ.नदीम शेख यांनी आरोग्य तपासणी केली. परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यशस्वीतेसाठी बाबा ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य आणि न्यु भारत हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने