*महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषदेतर्फे उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या महिलांचा *सन्मान सोहळा



 *महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषदेतर्फे उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या महिलांचा *सन्मान सोहळा*

जळगाव दि.१५( प्रतिनिधी):  जिल्हा नियोजन भवन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे *जि.प.अध्यक्षा मा.ना.सौ.रंजनाताई प्रल्हाद पाटील* यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका, मदतनीस,पर्यवेक्षिका व इतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच कोरोना काळात काम करतांना आपला जीव गमावलेल्या आशा ताई,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांना शासनाच्या विमा योजनेच्या माध्यमातून निधी चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले,

   *ग्रामीण भागातील महिलांच्या पाककृती पुस्तक प्रकाशन सोहळा* या कार्यक्रमाचे माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर जि.प.उपाध्यक्ष मा.श्री लालचंदभाऊ पाटील,महिला व बालकल्याण सभापती मा.सौ.ज्योती ताई पाटील,मा.जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब,जि.प.मु.का.का.आ.मा.श्री पंकज आशिया साहेब,जि.प.सदस्य मा.श्री नानाभाऊ महाजन,जि.प.सदस्या सौ.पल्लवी ताई देशमुख,जि.प.महिला व बालविकास अधिकारी राऊत साहेब,जिल्हा महिला विकास अधिकारी श्री परदेशी सर,बाल विकास प्रकल्प अधिकारी इंगळे मॅडम व मान्यवर उपस्थित होते श्री विनोद ढगे व त्यांचे टीमने पथ नाट्य सादर करून प्रबोधन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने